…अन्यथा शेकडो नागरीकांच्या उपस्थितीत महाराष्ट्र दिनी आंभोरा येथील पुलाचे उद्घाटन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील मौदी-आंभोरा वैनगंगा नदीवर नव्याने बांधण्यात आलेला पुल तात्काळ नागरीकांच्या रहदारीकरीता खुला करण्यात यावा अन्यथा शेकडो नागरीकांच्या उपस्थितीत १ मे महाराष्ट्र दिनी आंभोरा नदीवरील पुलाचे उद्घाटन करून सदर नागरीकांकरीता खुला करण्यात येईल असा इशारा भंडारा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातुन देण्यात आला आहे. भंडारा-गोंदिया या दोन जिल्ह्यांना जोडणाºया मौदी आंभोरा वैनगंगा नदीवर नव्याने बांधण्यात आलेला पुल रहदारीकरीता बंद असल्याने नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पुलाचे बांधकाम पुर्ण झाले असून नेत्यांच्या तारखा मिळत नसल्याने पुलाचा उदघाटन सोहळा लांबणीवर पडला आहे. भंडारा व नागपूर जिल्ह्यातील नागरीकांना अवागमन करण्याकरीता नदी ओलांडण्याकरीता जीव मुठीत घेऊन डोंग्यातुन प्रवास करावा लागत होता. किंवा दिडशे किलोमीटर फेरा मारुन मौदा मार्गे प्रवास करावा लागत होता. नागरीकांना होणारा त्रास लक्षात घेता या नदीवर पुलाचे बांधकाम करण्याची मागणी मागील अनेकवर्षापासुन सुरू होती.

अखेर या नदीवर पुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र पुलाचे बांधकाम पुर्णहोवुनही सदर पुल रहदारीकरीता खुला न झाल्याने नागरीकांत रोष दिसुन येत आहे. पुलाच्या बांधकामापुर्वी गेली अनेक वर्षे नागरी क प्रवाशी नदी ओलांडण्याकरीता डोंग्याचा वापर करायचे मात्र प्रशासनाने नदीकाठावर पोलीस चौकी लावीत डोग्यातुन प्रवासी वाहतुक बंद केल्याने नागरीकांना आजघडीला दिडशे किलोमीटर फेरा मारून पलीकडे ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठया प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे तसेच त्यांना मानसिक व शारिरिक त्रास सुध्दा सहन करावा लागत आहे. करीता आंभोरा वैनगंगा नदीवरील नवनिर्मीत पुल १ मे महाराष्ट्र दिना पुर्वी रहदारीकरीता सुरू करण्यात यावा अन्यथा शेकडो नागरीकांच्या उपस्थितीत सदर पुल एक मे रोजी महाराष्ट्र दिनी रहदारीसाठी मोकळा करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.

निवेदन देतांना माजी जि.प. सदस्य सुभाष , पुजा ठवकर,पहेला जिल्हा परिषद सदस्य कविता उईके , पं.स. सदस्या काजल चवळे , पं. स.सदस्या सिमा रामटेके ,बालू ठवकर, स्वप्नील आरीकर, राजू हलमारे आदि उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *