महानिर्मिती नाट्य स्पर्धा ‘वेडात म्हातारे वेगात दौडले तीन ‘

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : आत्महत्या करणे महाभयंकर पाप असले तरी, काही वेळा आपल्या मनासारख घडले नाही, कोणी मोठा अपमान केला, कधी मनातील संशय तर कधी फार मोठा अपेक्षाभंग त्यातुन कधीतरी वाटत की, आपण जगुन उपयोग नाही. जेव्हा जवळची माणसे आपल्याला समजुन घेत नाही. अशा वेळी स्वत:ला सावरायचं असतं पण जे सावरू शकत नाहीत त्यांचा आत्महत्येक-डे वळतात. पण शेवटी प्रश्न एकच, संशय, अपमान मोठा की, लाखमोलाचा जीव ! संशयाने घर तुतटे, मान अपमानाने माणुस असा झुरतो जणु स्मशानातील ओली लाकडं. अशावेळीपरिस्थितीचा विचार करत असतांना वास्तविकतेचा सुध्दा विचार करावा, आजुबाजुच्या आपल्यापेक्षा दु:खी माणसांच्या वेदना आपण समजुन त्यांच्या जगण्याच्या धडपडीचे कौतुक करावे व त्यांच्या जगण्याच्या धडपडीतुन आपले दु:ख आपण मोजुन पहावे तेव्हा कळते की या भुतलावर सर्वांना अनेक प्रकारची दु:खे आहेत. मोजीता दु:ख गगनास मावे, आनंदाच्या सुयार्ने मग हे क्षितीजझाकावे. आनंद मिळत नसतो, तो फुलांवरच्या दवबिंदुसारखा असतो ज्याला शोधता आला त्याच्यासाठी चहुबाजुला पडलेला मोत्यांचा सडा अथवा, पाण्याची एक ओस मात्र तेव्हा आशावादी मनाची काठी घेऊन नव्याने उभे राहून सकारात्मक विचार मनात ठेवावा व आपले आयुष्य नव्याने सुदंर जगता यावे. कारण आयुष्य फार सुंदर आहे, ते प्रत्येकाला जगता आले पाहीजे. भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राने हे नाटक प्रस्तुत केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *