शमशेर खान स्व.मनोहरभाई पटेल जयंतीनिमित्त सुवर्णपदक वितरण सोहळ्यात सन्मानित

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : स्व.मनोहरभाई पटेल स्मृती समिती, गोंदिया शिक्षण संस्थेच्या वतीने दि.९ फेब्रुवारी २०२३ रोजी मनोहरभाई पटेल यांच्या ११७ व्या जयंतीनिमित्त सुवर्णपदक वितरण सोहळ्यात लोकांना वेळोवेळी जिल्ह्यातील घडामोडी तसेच कोरोना काळ असो वा पूरपरिस्थिती अशावेळी रात्री-बेरात्री लोकांना आपल्या लाइव्ह बातम्याच्या माध्यमातून सत्य परिस्थिती सामोरे आणून आपल्या ‘शमशेर खान की खास खबर’ या सदरात विशेष बातम्यांचा माध्यमातून लोक जनजागृती करणारे बीएस क्राईम इंडिया न्यूज चे मुख्य संपादक तथासाप्ताहिक आवाज भंडारा चे संपादक शमशेर उर्फ बबलू खान यांचा मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकारिता पुरस्काराने सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस तसेच लोकनेते खा.प्रफुल्लभाई पटेल यांच्यासह उद्योगपती सज्जन जिंदल, अभिनेते जॅकी श्राफ, माजी खा.विजय दर्डा तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.त्याचप्रमाणे या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे शेतकरी, उत्कृष्ट खेळाडू यांचा स्वर्णपदक व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. शमशेर खान यांना हा पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचे नातलग, पत्रकार बांधव,विविध कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी वर्ग तसेच मित्रमंडळी कडून त्यांचे कौतुक केले जात आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *