पाणी गुणवत्तेसाठी सामुहिक जबाबदारी स्विकारा – कमलाकर रणदिवे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : पाणी गुणवत्तेबाबत प्रत्येकांनी आपापली जबाबदारी ओळखून सामुहिकरित्या पार पाडावी. जेणेकरून नागरिकांना शुध्द व गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी पोहचविता येईल, असे प्रतिपादन भंडारा जिल्हा परिषदचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी केले. जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता प्रशिक्षणाच्या उदघाटनाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद भंडारा, पाणी गुणवत्ता शाखेच्या वतीने पाणी गुणवत्ता व संनियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता प्रशिक्षण हॉटेल शिवम सभागृह भंडारा येथे काल ३० जानेवारी २०२४ ला पार पडले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, प्रकल्प संचालक (जल जीवन मिशन) एम.एस. चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता व्हि.एम. देशमुख, पाणी गुणवत्ता निरीक्षक श्री ए.एस. बागडे, गट विकास अधिकारी यांची उपस्थिती होती. कमलाकर रणदिवे म्हणाले, पाणी गुणवत्तेविषयी संनियंत्रण करण्याकरीता जिल्हा, तालुका व ग्राम पंचायत स्तरावर समित्या गठीत कराव्यात. त्यांच्या नियमित बैठका घाव्यात. याकरीता जिल्हास्तरावरील अधिकारी व गट विकास अधिकारी संनियंत्रणाचे काम नियमित करावे.

गावस्तरावर स्त्रोतांच्या सर्वेक्षणाचे काम अत्यंत काटेकोरपणे व्हायला हवे. ते योग्य तºहेने होत नाही आणि उपाययोजना करता येणार नाही. एखाद्या आजाराची साथ येते तेव्हाआपण उपाययोजना करण्याकरीता पुढाकार घेतो. परंतु तसे न होता कायम स्वरूपी उपाय व्हावेत. याकरीता जलसुरक्षक आणि आरोगय सेवक यांचेमाध्यमातून सर्वेक्षण चांगला होईल, या करीता लक्ष द्यावे. जिल्हास्तरीय प्रशिक्षणातून पाणी गुणवत्ता विषयक बाबींची माहिती घ्यावी. ग्रामपंचायत स्तरावर बैठका घेऊन पाणी गुणवत्ता विषयाला प्राधान्य द्यावे. नागरिकांना गुणवत्ता पाणी पोचविण्याकरीता प्रत्येकाच्या जबाबदाºया आहेत. त्या समजून घेत आपल्या अंतर्गत घटकाला समजावून सांगावे. प्रत्येकांनी आपापली जबाबदारी पार पाडली तर सामुहिकरित्या पाणी गुणवत्तेचा कार्यक्रम यशस्वी करू शकतो. पाणी पुरवठ्याच्या सुविधा आणि त्यातून गुणवत्तापूर्ण पाणी नागरिकांपर्यंत पोहचविण्याकरीता कार्यरत यंत्रणांतील सर्व घटकांनी सामुहिक कार्य करावे असे आवाहन केले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ यांनी, पाणी गुणवत्तेकरीता सामुहिकरित्या जागृती करून नागरिकांना शुध्द व गुणवत्तापूर्ण पाणी उपलब्ध करून देण्यास सांगितले. प्रशिक्षणाचे प्रास्ताविकात प्रकल्पसंचालक एम.एस. चव्हाण यांनी, पाणी गुणवत्ता व संनियंत्रण कार्यक्रमात प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

पाणी गुणवत्तेबाबत जर एखादी बाब आढळून आली तर ती सर्वांना माहिती व्हायला हवी. आपल्याला एखादा स्त्रोत दूषीत आढळला तरतात्काळ माहिती व्हायला हवी. जेणेकरून दूषीत स्त्रोतावर कार्यवाही करता येईल. योजना पूर्ण होवून त्यापासून मिळणारे पाणी शुध्द असणे महत्वाचे आहे. त्याकरीता प्रत्येक स्त्रोतांचे संरक्षण व्हायला हवे. पाणी देण्यासोबतच शुध्द पाणी देणे सर्वांकरीता महत्वाचे आहे. चांगल्या गुणवत्तेचे पाणी वितरणासाठी प्रशिक्षणाचा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हास्तरीय प्रशिक्षणाचे संपूर्ण नियोजन पाणी गुणवत्ता निरीक्षक ए.एस. बागडे यांनी केले होते. गट विकास अधिकारी यांना, राज्यस्तरावरून प्राप्त झालेल्या शासननिर्णय पुस्तिकेचे वितरण अतिरिकत् मुख्य कार्यकारी अधिकारी मा.रणदिवे यांचे हस्ते वितरीत करण्यात आले. प्रशिक्षणाला गट विकास अधिकारी, तालुका वैद्यकिय अधिकारी, उप अभियंता (ग्रा.पा. उप विभाग) शाखा अभियंता, प्रयोगशाळा प्रमुख, बिआरसी सिआरसी, अंमलबजावणी सहाय संस्था प्रतिनिधी, जिल्हा कक्षातील तज्ञ सल्लागार यांची उपस्थिती होती. प्रशिक्षणाला मार्गदर्शक म्हणून अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी श्री चव्हाण, प्रयोगशाळा प्रमुख श्री कातोरे, श्री रोकडे, लाखांदूरचे प्रयोगशाळा प्रमुख कुंजम आदींनी पाणी गुणवत्ता विषयक विविध बाबींवर यशोचित मार्गदर्शन केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *