जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रा.नरेश आंबिलकरांचा सत्कार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा: महासंस्कृती महोत्सवात प्रा.नरेश आंबिलकर यांचा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भंडारा येथे सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.झाडीबोली महासंस्कृती महोत्सवात भंडारा जिल्ह्यातील विविध लोककलांचे सादरीकरण करण्यात आले.या लोककलांच्या आयोजनासाठी प्रा.नरेश आंबिलकर यांनी महत्त्वापूर्ण भूमिका बजावली होती. त्यांच्या या कार्याची दखल घेत जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी महासंस्कृती महोत्सवात प्रा.नरेश आंबिलकर यांचा शाल,श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय श्री.नरेंद्र तिडके महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. मनोज तेलरांधे, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना दिले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *