भव्य स्वरूपात निघणार श्रीरामाची शोभायात्रा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : मागील काही वर्षात बंधनांमुळे श्रीराम नवमी शोभायात्रेचे स्वरूप भव्यदिव्य असे नव्हते. मात्र पुन्हा एकदा तेवढयाच दिमाखात आणि उत्साहात ही शोभायात्रा काढली जाणार आहे. चित्ररथ स्पर्धेचे आयोजन व सलग पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे भव्य स्वरूपात करण्यात आलेले नियोजन शोभायात्रेचे वेगळेपण सांगणारे असल्याचे श्रीराम शोभायात्रा समितीचे अध्यक्ष हेमंत आंबेकर यांनी सांगितले. श्रीराम शोभायात्रा समितीच्या वतीने गुढीपाडवा ते रामनवमी या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या संदर्भात माहिती देण्याच्या दृष्टीने रविवारी १९ रोजी समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. समितीचे अध्यक्ष हेमंत आंबेकर आणि कार्यक्रम आयोजन समितीचे संयोजक जॅकी रावलानी यांनी यावेळी माहिती दिली. श्रीराम शोभायात्रा समितीचे हे ५१ वे वर्ष आहे. मागील दोन वर्षाचा अपवाद वगळता समितीच्या माध्यमातून भव्यदिव्य अशी श्रीरामाची शोभायात्रा शहरात काढली जाते. यावेळीही त्याच उत्साहात आणि भव्य अशा स्वरूपात शोभायात्रा काढली जाणार आहे.

गुढीपाडव्याला गांधी चौकात मोठी गुढी उभारून आणि गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला शहरात मोटरसायकल रॅली काढून कार्यक्रमाची सुरुवात होईल. यावेळी सलग पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे. आयोजन समितीचे संयोजक असलेल्या जॅकी रावलानी यांनी सांगितले, २५ रोजी सकाळी ७ वाजता रामरक्षास्त्रोत पठण, २६ रोजी सकाळी ७ वाजता श्रीराम दौड व ३० रोजी सायंकाळी ५.३० वाजता शोभायात्रा खांबतलाव येथील श्रीराम मंदिर येथून निघेल. मागील वर्षी घेण्यात येणार असून सहभागी होण्यासाठी पाचशे रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. पहिल्या तीन चित्ररथांना अनुक्रमे १५ हजार रुपये, ११ हजार व ७ हजार रुपयाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल. तर इतर सर्व सहभागी स्पर्धकांना ३ हजार रुपये प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात येईल. २५ मार्च रोजी महादेव आर्ट ग्रुप हरियाणा यांच्या शिव विवाह, शिवभस्म नृत्य, शिवतांडव, महाशिव भस्म आरती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २६ मार्च रोजी क्रिष्णलिला, मयूरनृत्य, पुष्पहोली (वृंदावन) महारास कार्यक्रम केशव आर्ट महारास गृप वृंदावन धाम सादर करतील.

२७ मार्च ला इंडियन आयडल फेम सुप्रसिध्द गायीका वैशाली राकयवार यांचा व २८ मार्च ला सुप्रसिध्द गायीका शहनाज अख्तर यांचा भव्य भक्तीगीतांचा कार्यक्रम होईल. २८ मार्च रोजी श्रीराम चरित्रावर आधारीत भव्य महानाट्य सादर करण्यात येणार असून त्याआधी दुपारी ३ ते ५ या वेळात रांगोळी स्पर्धा होईल. स्पर्धत विजेत्यांना पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे. हे सर्व कार्यक्रम खात रोडवरील रेल्वे मैदानावर संध्याकाळी ७ ते १० या वेळात होणार असल्याचे रावलानी सांगितले. भव्य अशा स्वरूपात होणाºया श्रीराम नवमी उत्सवात नागरिकांनी सहभागी व्हावे. होणाºया कार्यक्रमांना हजेरी लावावी. रामनवमीच्या दिवशी प्रत्येकाने घरी दिव्यांची आरास करून भगवे झेंडे घरावर लावावे आणि श्रीरामाच्या शोभायात्रेत मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष हेमंत आंबेकर, जॅकी रावलानी व अन्य पदाधिकाºयांनी केले आहे. पत्रकार परिषदेला धनंजय ढगे, बाळा गभने, प्रकाश पांडे, सुरेश धुर्वे, विश्व हिंदू परिषद मातृशक्तीच्या दीपा नायर, न झालेली चित्ररथ स्पर्धा यावेळी कांचन ठाकरे उपस्थित होत्या.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.