मुख्यमंत्र्यांनी घेतली ग्रीनहेरिटेजच्या पत्राची दखल

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र राज्याचे नागपुर येथे सुरू शीतकालीन अधिवेशन दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ग्रीन हेरिटेज पर्यटन संस्थातर्फे अंबागड किल्ल्याचे शीघ्र जीर्णोद्धार व पर्यटन विकास करणेबाबत पत्र संस्थाचे संस्थापक, अध्यक्ष मो सईद शेख यांनी दिले होते, त्या पत्राची दखल मुख्यमंत्री यांनी घेतली आणि पुरातत्व विभाग महाराष्टÑ शासनाला सदर किल्ल्याची पाहणी करून जतन व संवर्धन कार्य तथा अपेक्षित निधी बाबत आवश्यक कार्यवाही करून सविस्तर अहवाल तात्काळ शासनास सादर करण्याचे निर्देश ही देण्यात आले. या पत्राची एक प्रत संस्थेला ही प्राप्त झाली आहे. या करिता संस्थेचे सईद शेख यांनी मुख्यमंत्रीचे विशेष आभार मानले आहे. पत्र देता क्षणी किल्ल्याचे वारस राजे वीरेंद्र शाह बख्त बुलंद हे सोबत उपस्थित होते.

नुकतेच राज्याचे बजट मध्ये प.महाराष्ट्र, मराठ वाडयातील तीर्थ स्थळांना भरीव निधी मंजूर करीत झूकते माप देण्यात आले. पंढरपूर, भीमाशंकर, जेजुरी (प्रत्येकी १०० कोटी), तुळजाभवानी (२००), अष्टवीनायक(१५० कोटी) राज्य शासन कडून मंजूर करून आराखडा तयार करण्यात आले. त्याच धर्तीवर विदर्भ विशेष करुन भंडारा जिल्ह्यातील गायमुख, चांदपूर, पौनी, गिरी गोसावी स्मारकमंदिर समूह तीर्थ व पर्यटनस्थळा करिताही शासनाने जास्तीस, जास्त निधी मंजूर करून झूकता माप द्यावा असे पत्र मुख्यमंत्री व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पाठविण्यात येणार आहे. शेख मागील ४० वर्षांपासून किल्ल्याचे उद्धारासाठी प्रयत्नशील आहेत. माजी पंतप्रधान पासून तर मुख्यमंत्री पर्यंत कसोशीने प्रयत्न केले.

पत्राची दखल घेण्यात येऊन २००४ मध्ये किल्ल्यास राज्य संरक्षित वास्तू म्हणून मान्यता प्राप्त झाली व २ कोटी ३० लाख रु मंजूर झाले. आजतागायत ८ कोटी पेक्षा जास्त निधीचे कामे पुरातत्व विभाग कडून करण्यात आले. ज्यातून काही जतन विषयक कामे झाली तर काही असंतोष जनक, पण शेष कामे करण्यास ५० कोटी पेक्षा जास्त निधीची गरज पडणार, ज्यामधे अनेक जीर्ण इमारती, अवशेषचे कामा सोबत पर्यटन सुविधा निर्माण करणे इ. कामे करावे लागतील. ही कामे झाली तर विदर्भातील एकमेव असा हा किल्ला पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बनू शकेल, यात शंका नाही.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *