भंडारा येथे जागतिक आॅलम्पिक दिन उत्साहात साजरा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : एकविध क्रीडा संघटना भंडारा जिल्हाच्या वतीने २३ जूनला जागतिक आॅलिंपिक दिन गांधी चौक येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी एकविध क्रीडा संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत ईलमे, तलवारबाजी असोसिएशन महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुनिल कुरंजेकर यांनी तिरंगी फुग्गे उडवून रॅलीचे उध्दघाटन केले. त्यावेळी छत्रपती पुरस्कार प्राप्त राजेंद्र भांडारकर, क्रीडा मार्गदर्शक अरुण बांडेबुचे, तिरंदाजी असोसिएशनचे सचिव अशिक चूटे, कराटे असोसिएशन भंडाराचे सचिव विकास बागडे, बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव शामू बांते, वुशू कराटे असोसिएशनचे सचिव मनोज साकुरे, हेमंत धूमनखेडे व जागतिक आॅलिंपिक दिनानिमित्त विविध खेळांचे क्रीडा मार्गदर्शक व खेळाडू उपस्थित होते. सदर रॅली भंडारा शहरातील गांधी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज संकुल पर्यंत काढण्यात आली होती. रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुल येथे करण्यात आले.

याप्रसंगी क्रीडा मार्गदर्शक अरुण बांडेबुचे यांनी सर्व युवक व खेळाडूंना जागतिक आॅलम्पिक दिनाचे महत्त्व पटवून दिले. व खेळाडूंमुळे देशाचा मान, सन्मान वाढविला जातो. जागतिक स्तरावर देशाचा सन्मान वाढविण्याचे कार्य खेळाडूंच्या माध्यमातुन होतअसते. खेळाडूमुळे पुढच्या पिढीला प्रोत्साहन, प्रेरणा मिळत असते व पुढील पिढी सुद्धा त्याचे अनुकरण करून विविध क्रिडा क्षेत्रामध्ये आपले नाव लौकिक करत असतात. तसेच छत्रपती पुरस्कार प्राप्त राजेंद्र भांडारकर यांनी भंडारा जिल्ह्याने राज्य व देश पातळीवर अनेक खेळाडू दिलेले आहेत ही बाब भंडारा जिल्ह्यासाठी गौरवास्पद आहे. प्रशासनाने जिल्ह्यातील युवकांना योग्य सहकार्य करून साहित्य पुरवठा व मार्गदर्शन शिबिर आयोजित केले तर भंडारा जिल्हा देशाला अनेक उच्चस्तरीय खेळाडू देऊ शकतो, असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तलवारबाजी असोसिएशन महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुनिल कुरंजेकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव शामू बांते यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता आकाश खोत, राजेश चोपकर, सौरभ तोमर, प्रशांत शेंडे, प्रकाश सिंग, निशिकांत इलमे, सोहेल अन्सारी, संजय दमाहे, अंकित भगत, साक्षी कटकवार, राज पिल्लारे, सुनील पंचबुधे, अजय ब्राह्मणकर, सतीश ईलमे, युवराज ठवकर, उमेश मोहतुरे तसेच विविध खेळांचे क्रीडा मार्गदर्शक व खेळाडूंनी सहकार्य केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.