जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांच्या हस्ते गोपीवाडा येथे वाचनालय व ग्राऊंडचे उद्घाटन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्हातील गोपीवाडा आदर्श गाव योजने अंतर्गत वाचनालयाच्या उद्घाटन सोहळा व विविध खेळांचे ग्राउंडचे पूजन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर व जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कंमांडो ग्रुपचे संस्थापक चंद्रशेखर डोळस, पंचायत समिती सदस्य संजय बोन्द्रे, सरपंच विनायक टांगले, महाराष्ट्र मेटल मॅनेजर मूर्ती, अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे, महषी विद्यालय मुख्याध्यापक स्तुती मॅडम, शाळा समिती अध्यक्ष भगवान टांगले, जवाहरनगर ठाणेदार बोरकुटे, मुख्याध्यापक बावनकुळे, उपसरपंच निंबाते, श्रीकृष्ण झंझाड, जयंत बुधे, कुंभारे सर, यशपाल मते, भारत वडीचार, ग्रामविकास अधिकारी चौधरी, नामदेव गोंदुळे, सा.कार्यकर्ता आदेश कानतोडे, ग्रामपंचायत सदस्य मीना वडीचार, अनिता धोतरे, स्वप्नील टांगले, सुरेखा खटके, आशा झंझाड, शिल्पा डोळस, मेश्राम, कंमांडो ग्रुपचे सर्व मुले,मुली, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व गावकरी उपस्थीत होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *