सावरी येथील राम मंदिरामध्ये विविधांगी उपक्रमाचे आयोजन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी जवाहरनगर : राम मंदिर सावरी येथे रामनवमीचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित करण्यात आले. या स्पर्धेत चार गट तयार करण्यात आले होते. ज्यामध्ये एलकेजी आणि यूकेजी आणि इयत्ता पहिली ते तिसरी, इयत्ता चौथी ते सहावी आणि चौथीपर्यंत. इयत्ता ६ वी व त्यावरील मुलांसाठी स्वतंत्र गटाचे आयोजन करण्यात आले होते. या गटात लहान मुलांनी सहभाग घेतला होता. ज्यामध्ये सुमारे ८० मुलांनी चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धेत तर ३० मुलांनी फॅन्सी ड्रेस स्पर्धेत सहभाग घेतला. यामध्ये लहान मुलांनी फॅन्सी ड्रेस स्पर्धेत रामायणातील पात्र साकारले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिर समितीचे अध्यक्ष जय गोपाल सिंग, सचिव विवेक पाठक, कैलाश सोनी, रमण खन्ना, विक्रम भांगरे, प्रदीप आर्चाजी, स्वप्नील विश्वकर्मा, अभय राजपूत आणि समिती सदस्यांनी सहकार्य केले. ३० मार्च रोजी विजेत्यांना आयुध निर्माणी महाव्यवस्थापकांच्या हस्ते पारितोषिक वितरीत करण्यात येईल.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *