कपडे विक्रीतून मिळवले आर्थिक स्वावलंबन…प्रीती तिरपुडे यांची यशोगाथा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील साधारण ३२००० महिला ह्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटांशी जुळलेल्या आहेत. नुकत्याच नवतेजस्विनी प्रदर्शनी अंतर्गत मावीमच्या महिला बचत गटांनी तीन दिवसात तीन लाखाच्या वर वेगवेगळ्या उत्पादनांची विक्री केली. याच प्रदर्शनात प्रीती तिरपुडे त्यांनी बचत गटाच्या कर्जाद्वारे अर्थसहाय्य घेऊन रेडीमेड कपडे विक्री केली व आज त्या आर्थिक स्वावलंबी झालेल्या आहेत. साकोली पासून ५ कि.मी अंतरावर वसलेले बोदरा हे गाव महाराष्ट्र ग्रामीण पतपुरवठा योजने अंतर्गत आहे. या गावात माविमने प्रवेश केला. महिलांना एकत्र करून गावात बचत गट निर्माण केले. गावात माविम स्थापीत १२ बचत गट आहेत. त्यापैकी अंकुर महिला बचत गटाची स्थापना १ जानेवारी २०१५ ला झाली. याच गटातील सौ. प्रीती रविंद्र तिरपुडे घरची आर्थिक परिस्थिती हलाकीचीच परिस्थिती बदल घडवून आणण्याची तिची जिद्द होती. त्यासाठी तिने बचत गटाचा आधार घेतला. लोकसंचालित साधन केंद्रच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीचा मार्ग निवडला गटातून ३ हजार रुपए अंतर्गत कर्ज घेतले.सह्योगीनीच्या मदतीने तिने रेडीमेड पेटीकोट, ब्लाउज पीस खरेदी करून आणले व गावात व आजू बाजूच्या गावात विक्री केली. तिला व्यवसाय मधून नफा झाला त्यामुळे व्यवसायात वाढ करण्याचे ठरविले. लोकसंचालित साधन केंद्र मार्फत महात्मा फुले महामंडळ मध्ये कर्ज प्रस्ताव करण्यात आला १० हजार रुपए कर्ज मंजूर झाल. प्रीतीने आपल्या व्यवसायात वाढ केली. व्यवसायात पुन्हा वाढ करायचे तिने ठरविले. गटाला कउकउक बँकचे कर्ज देण्यात आले त्यात प्रीतीने ७३ हजार रुपए कर्ज घेतले व माल खरेदी केला. ती स्वत: सायकलने सर्व माल घेऊन जवळच्या गावात माल विक्री करत असायची, यातच माविमकडे मानवविकास अंतर्गत ई-रिक्षा ची योजना आली, प्रीतीला होत असलेल्या त्रासाचा विचार करून लोकसंचालित साधन केंद्र ने प्रीतीला ई-रिक्षा देण्याबाबत गटाला सांगितले. गटाने पण ई-रिक्षा गटाला घेऊन प्रीतीला देण्याचे ठरविले. ईरिक्षाचा तिला खूप फायदा झाला. प्रीती आता आपल्या पती सोबत साकोली तालुक्यात व आजूबाजूच्या तालुक्यात रेडीमेट कापड विक्री करते आता तिने घरी कपड्याचे दुकान पण सुरु केले आहे. आता प्रीती महिन्याकाठी किमान १५ ते २० हजार रुपए कमवीते. त्यामुळे तिच्या घरच्या आर्थिक स्थिती मध्ये प्रगती झाली आहे. परिस्थितीत बदल झाल्यामुळे तिचे पती पण इतर मजुरी करण्यापेक्षा तिला ह्या कामात मदत करतात. माविम व लोकसंचालित साधन केंद्राच्या मार्गदर्शनामुळे व गटाच्या सहकार्यामुळे आपण हे करू शकलो अशी भावना व्यक्त प्रीती करते. जिल्हा माहीती कार्यालय भंडारा

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *