थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम वेगात

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : महावितरणच्या गोंदिया परिमंडळा अंतर्गत येत असलेल्या गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक वर्गवारीतील तब्बल ४२,४१० ग्राहकांकडील थकबाकीची रक्कम ४ कोटी ८ लाख रु. इतकी असून या ग्राहकांविरोधात कठोर कारवाई करण्याचे सक्त निर्देश महावितरण ने संबंधिताना दिले आहेत. वीजबिलांची थकबाकी असणाºयांच्या वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरण कडून करण्यात येत आहे. थकबाकीदारांचा भरणा न झाल्यास कोणत्याही स्थितीत थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार वीजबिल वसूली व थकबाकीदा- रांच्या विरुद्ध कारवाईला वेग आला आहे. गोंदिया परिमंडळात आतापर्यंत ४ हजार २७३ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
तेव्हा, पुढील कटू कारवाई टाळण्यासाठी ग्राहकांनी त्वरित वीजबिल भरावे असे आवाहन महावितरण गोंदिया परिमंडळातर्फे करण्यात आले आहे. वीज ग्राहकांनी वीजबिलांचा भरणा करण्यासाठी वीज देयक छापील दिनांकापासून ७ दिवसाचे आत भरणा करून वीज देयकाच्या रकमेत १ टक्के सवलतीचा लाभ घ्यावा. तसेच डिजिटल पेमेंट द्वारे भरणा करून ०.२५ % ते ५०० रुपयापर्यंत सवलतीचा लाभ घ्यावा. तसेच गो- ग्रीन सुविधेचालाभ घेऊन आॅनलाइन भरणा केल्यास प्रती देयक १० रु. लाभ देण्यात येतो. सर्व थकबाकीदार ग्राहकांनी थकीत असलेले वीज बिल त्वरित भरणा करून महावितरणला सहकार्य करावे व पुढील कटू कारवाई टाळावी. गुरुवार दि. ३० मार्च २०२३ ला श्रीराम नवमीची सुट्टी असली तरी मार्च अखेर असल्यामुळे सर्व रोख संकलन केंद्र सुरू राहतील याची ग्राहकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जनसंपर्क अधिकारी,महावितरण गोंदिया यांनी कले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *