साकोली येथे कर वसुलीसाठी ५ गाळे सीलबंद

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : नगर परिषद साकोली चे कर वसुलीमोहीम मागील दोन महिन्यांपासून सुरू असून ३१ मार्च जवळ येत असल्यामुळे जप्तीची मोहीम सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे. दि २९ मार्च ला दुपारी १२ वाजताच्या सुमारास नगर परिषद मालकीचे गाळ्यांवर व इतर दुकानदार यांचेवर धडक जप्तीची कारवाई करण्यात आली. या कारवाई अंतर्गत ५ गाळे सीलबंद करण्यात आले व १.५० लाखाच्या जवळ वसुली करण्यात आली. या कारवाई मुळे इतर थकीत मालमत्ता धारक यांच्या मनात धडकी भरली आहे. जप्तीची कारवाई बघून इतर मालमत्ता धारकांनी कर भरण्याचा धडाका सुरू केलेला आहे. यानंतर एक एक प्रभागात ही मोहीम सुरू राहणार आहे. आजची मोहीम मुख्याधिकारी डॉ रामटेके यांच्या मार्गदर्शनामध्ये स्वप्नील हमाणे व प्रशासकीय अधिकारी यांच्या पथकाने पार पाडली. यामध्ये लिपिक श्री. गेडाम, श्री. नांदेश्वर, श्री. सोनवणे, श्री. साखरे व इतर कर्मचारी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *