झाडाला गळफास घेवून युवकाची आत्महत्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : तालुक्यातील ढोलसर येथील शेत शिवारात एका युवकाने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जिवन यात्रा संपविली सदर घटना शुक्रवारी १६ जूनच्या पहाटे ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. विकास शंकर नान्हे वय (२८) रा . ढोलसर असे मृतक युवकाचे नाव असुन शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत त्याचा मृतदेह आढळला. मिळालेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी सकाळच्या सुमारास गावातील एक महिला शेतशिवारात शौचास गेली असता मधुकर बेदरे यांच्या शेतातील कडुनिंबाच्या झाडाला विकासने लाल रंगाच्या दुपट्ट्याने गळफास घेतलेला दिसला. हा प्रकार पाहिल्यावर घाबरलेल्या महिलेने कुटुंबियांना माहिती दिली. लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक अनिल मांदाळे, हवालदार विलास मातेरे, अंमलदार टेकचंद बुरडे, वाहनचालक भुपेश बावनकुळे यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. विकासने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाला नाही.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *