गडेगाव येथील तरूण ठरला जिल्ह्यातील पहिला अग्निवीर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : तालुक्यातील गडेगाव येथील सर्वसामान्य कुटूंबातील १९ वर्षीय तरुणाची अग्णिवीर योजनेअंतर्गत ‘इंडियन नेव्ही’ मध्ये निवड झाली असुन तो जिल्ह्यातील पहिला अग्निवीर ठरला आहे.दिप देवेंद्र कच्छवाह असे त्या अग्निवीराचे नाव असुन त्याची पहिल्याच प्रयत्नात निवड झाल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. देशाच्या सुरक्षा विभागातील सैनिक सेवेत तरुणांचा टक्का कमी असल्याने सरकारने‘अग्निवीर’ योजना राबविण्यास सुरूवात केली आहे.त्यामध्ये तरूण,होतकरून तरूणांना सैनिकाच्या रूपात देशसेवेची संधी प्राप्त होत आहे. संरक्षण विभागात ‘नेव्ही’ हे अत्यंत अवघड क्षेत्र समजले जाते. परंतु त्याला फाटा देत आता कमी वयातील तरुण देखील सैनिक व नेव्ही सेवेकडे वळू लागले आहेत.

गडेगाव येथील दिप देवेंद्र कच्छवाह हा लहानपणापासून अभ्यासात तेमतेम होता.मात्र इयत्ता १२ वी मध्ये त्याने लिटिल फ्लॉवर इंग्लिश स्कूल, लाखनी या शाळेतून ८४ टक्के गुणासह तो उत्तीर्ण झाला. दिप चे वडील त्याचे वडील प्रॉपर्टी चा व्यवसाय करतात. व घरची शेती सांभाळतात. आई सुध्दा घरकामच करते तर लहान भाऊ ११ व्या वर्गात शिकत आहे. दिपच्या मनात पुर्वीपासुन इतर मुलांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती. त्याने मोठे झाल्यावर इंििडयन नेव्ही च्या माध्यमातुन देशाची सेवा करण्याचा निर्णय त्याने पुर्वीच घेतला होता. आणि त्याकरीता त्याने अथक परिश्रम सुध्दा घेतले.

अग्निवीर योजनेअंतर्गत त्याने ‘इंडियन नेव्ही’ करीता मुंबई येथे त्याने अर्ज केला होता.त्याची परीक्षासुध्दा त्याने उत्तीर्ण केली. मैदानी चाचणी परीक्षेतही त्याने यश संपादन करीत सर्व पात्रता पूर्ण करून ४ महिने प्रशिक्षण पूर्ण केले व सुट्टयांमध्ये तो १७ एप्रिल रोजी त्याच्या घरी गडेगाव येथे परतला.

मी ग्रामीण भागातील, त्यातही शेतकरी कुटुंबातील. मला शिकून देश सेवेतच जायचे होते. यासाठी माझे आई, वडील, भाऊ, नातेवाईक आणि माझे शिक्षक यांचे पाठबळ मिळाले त्या बद्दल मी त्यांचा आभारी आहे. आज सामान्य तरुण कुठेच मागे नाहीत. स्वत:ला कमी लेखू नका, शिका, प्रयत्न करत रहा. एक दिवस तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.

दीप देवेंद्र कच्छवाह अग्निवीर,एसएसआर

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *