भरदिवसा कारच्या काचा फोडुन लाखो रुपये लंपास

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : बँकेतून रक्कम काढून नाश्ता करीत असताना अज्ञात चोरट्याने चार चाकी गाडीचे काच फोडून तब्बल २.७५ लाख रुपये अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना आज दिनांक ११ आॅक्टोंबर दुपारी १२:३० वाजताच्या दरम्यान शहरातील श्रीराम भवन येथील इमारती जवळ वर्दळीच्या ठिकाणी घडली. सविस्तर वृत्त असे की आज भर दिवसा तुमचा शहरात एका चार चाकी गाडीचे काच फोडून चोरट्याने २.७५ लाख रुपये चोरून नेले सदर फिर्यादी रोहन बालपांडे व २८ वर्ष राहणार देव्हाडी हा त्याच्या मित्र मुकेश मलेवार यांच्यासोबत एचडीएफसी बँक मधून रक्कम काढून श्रीराम भवन इमारती जवळ इंडिको मांझा गाडी एमएच ३४ एए ७९४० पार्क करून २०० मीटर अंतरावर असलेल्या भांडके यांच्या हॉटेलमध्ये नाश्ता करायला गेला. दरम्यान नाश्ता करून रोहन गाडी जवळ आला असता गाडीचे काच फुटलेले होते व गाडीतील रक्कम चोरी गेले होते. ही घटना पाहूनरोहनने तुमसर पोलीस स्टेशन गाठले आणि तुमच्या पोलिसांना चोरीची माहिती दिली. यात घटना समोर एका किराणा दुकानातील मुलाने चोरांना व गाडीला पाहिल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी या मार्गावरील सर्व दुकाने मध्ये लावलेले सीसीटीव्ही फुटेज पाहू लागले. आणि एका कपडा दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये गाडी व चोर दिसून आले. या चोरीच्या गाडीची सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी सर्वत्र पाठवली असून फिर्यादी रोशन बालपांडे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरा विरुद्ध तुमसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.