पडोळे जिंकले शहर विकासाची न्यायालयीन खेळी!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : सन २०१९-२० च्या आर्थिक वर्षात नगर परिषद तुमसरने वैशिष्टयपूर्ण कामासाठी ठोक तरतूद म्हणून २०२१ मध्ये तब्बल ३ कोटींची विविध विकास कामांची निविदा मागविली होती. सदर कामांची रक्कम नगर विकास मंत्रायलाने नप तुमसरच्या खात्यात जमा देखील केली होती. त्यावर विद्यमान आमदार राजू कारेमोरे यांनी नगर परिषदने सुचविलेल्या कामांना डावलून नवीन कामांची यादी तसेच काम हाताळणारी संस्था नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी शहर हिताची बाजू धरून हाय कोर्टात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयाने पडोळे यांच्या बाजूने निकाल लावल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे नपने सुचविलेली तब्बल ३३ विकास कामे यथावत होणार आहेत. त्यातील काही निवडक कामांचे भूमिपूजन देखील झाल्याची माहिती पडोळे यांनी दिली आहे.

नप तुमसरने २०२१ च्या सप्टेंबर महिन्यात नपतू/ साबांवी१५३७ अंतर्गत जुन्या बदलण्याच्या हेतून निधी प्रभाग क्रमांक २,४,५, ६ व ७ सार्वजनिक बांधकाम विभागाला वळता केला होता. दरम्यान शहरात राजकीय विरोधाच्या ठिणग्या उडाल्याचे चित्र देखील स्थानिकांनी अनुभवले होते. त्याच्या विरोधात तत्कालीन करीता ९३ लक्ष ७०५ रुपये, प्रभाग क्रमांक ८,९ व ११ करीता १ कोटी ३ लक्ष ६७ हजार ५१४ तसेच तिसºया टप्प्यात प्रभाग क्रमांक ३,४,६ व ११ करीता ९५ लक्ष ९८ हजार ६६ रुपयेअशी अंदाजे एकूण ३ कोटी रुपयांच्या कामाचे नियोजन हाती घेतले होते. सदर कामाची निविदा प्रक्रिया देखील राबविली मात्र शासकीय प्रक्रियेत झालेला खर्च, लागलेली वेळ आणि स्थानिकांना मिळणारे सार्वजनिक लाभ यांना केंद्र करत तक्तालिन गेली. मात्र ती कामे नगराध्यक्ष पडोळे यांनी हाय राजकारणाचा भाग ठरून त्यावर खुद्द आमदार कारेमोरे यांनी ती कामे बदलून प्रशासनाला नवीन कामाची सूची देय केली होती. त्यातून सदर नियोजित कामांना तब्बल २ वर्षांचा खंड पडला. कोर्टात धाव घेतली होती. त्यात शहर विकासाचे नियोजन लक्षात घेता न्यायालयाने गत महिन्यात पडोळे यांच्या बाजूने निकाल दिल्याने शहरात यथावत विकास कामांना सुरुवात झाली आहे.

नगर पालिका हाताळणार कामे

आमदार कारेमोरे यांनी राजकीय दबावापोटी शहरी कामांचा ३ कोटींचा निधी नपला डावलून सार्वजनिक बांधकाम विभागाला वळता केला होता. त्यात नवीन कामे देखील सुचविण्यात आलेली होती. मात्र माननीय हाय कोर्टाने सदर निधी व कामांचे अधिकार नगर पालिकेला दिले आहे. त्या कामांमध्ये रस्ते, नाली, कव्हर, नप मालकीच्या जागेवर आवार भिंत, बालोद्यान तसेच इतर महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे, हे विशेष! शहरात नियोजित ३३ कामांचा उल्लेख मी आपल्या विकासनाम्यात केला होता. त्यातून विरोधकांनी राजकारण देखील केले होते. मात्र हीच कामे माननीय हाय कोर्टाने यथावत ठेऊन निधी देखील नपला वळता करण्याचे आदेश दिले आहेत. त्यातील काही कामांचे शुभारंभ देखील झाले आहेत, न्यायालयीन लढाई जिंकली यापेक्षा आपण स्थानिकांना दिलेले शब्द पाळले, याचे मला जास्त समाधान आहे.

: प्रदीप पडोळे, माजी नगराध्यक्ष, नप तुमसर.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *