जीवाची पर्वा न करता त्याने वाचविले विद्यार्थ्याचे प्राण

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : स्वत:च्या जीवाची पर्वा न करता साहिल या १७ वर्षीय तरुणाने आठव्या वर्गात शिकत असलेल्या संकेतला नहराच्या पाण्यात बुडत असतांना त्याचे प्राण वाचविले. यामुळे साहिलचे सर्वच कौतुक होत आहे. सविस्तर असे की, तुमसर तालुक्यातील बावनथडी प्रकल्पाचे मुख्य कालवा खापा गावाला लागून वाहत आहे. रब्बी पिकाला पाणी देण्याकरिता बावनथडी प्रकल्पाचे पाणी सध्या नहराला देण्यात येत असून नहर हा दुथळी वाहत आहे. प्रकल्पाचे पाणी नहरातून सकाळ पाळीतून सुरू असते. शाळा असल्याने शाळा संपवून विद्यार्थी हेघरी खेळत असताना आई-वडिलांची नजर चुकवून तो नहर भ्रमणकरिता गेले असता विद्यार्थ्याच्या नहरात पाय घसरून पडल्याने तो पाण्यामध्ये तरंगू लागला.
शेतामध्ये काम करीत असलेला. साहिल राजू कुकडे याच्या लक्षात येताच त्याने चक्क नहरामध्ये उडी घेऊन त्या विद्यार्थ्यांचे प्राण वाचवले. संकेत अशोक ठाकरे वय ८ वर्ष रा. खापा हा आपल्या आई-वडिलांना एकुलता एक मुलगा आहे. साहील राजू कुकडे वय १७ रा. खापा याने आपल्या जिवाची पर्वा न करता नहराच्या वाहत्या पाण्यात बुडत असलेल्या संकेत या विद्यार्थ्याला पाण्यातून सुखरुप काढून जीवनदान दिले. विद्यार्थी हा जिल्हा परिषद पूर्वमाध्यमिक शाळा येथील वर्ग दुसºया वर्गाचा विद्यार्थी आहे. साहीलने याआधीही जिवाची पर्वा न करता एक-दोन लोकांचे जीव वाचवले आहे. त्याच कार्याची दखल घेत ग्रामपंचायत खापाच्या वतीने साहीलचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच हंसराज ठवकर, सौ. जयाताई माटे, दुर्गाप्रसाद ठवकर, सुभाष सोनवणे, रामू भोयर, जयराम माहुले, रवि गणवीर, मनोरंजन हाडगे, भगवान ठवकर, गोपी ठवकर, अनिल ठाकरे, शत्रुघन पिकलमुंडे, अंकुश तुमसरे, उदाराम पीकलमुंडे, पत्रकार नाना ठवकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. साहील कुकडे यांचे खापा ग्रामवासी यांनी कौतुक केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *