तुमसर तालुक्यात तात्काळ धान खरेदी केंद्र सुरू करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : तुमसर तालुक्यात शासकीय आधारभुत धान खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी विकास फाऊंडेशन तर्फे तुमसरचे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातुन करण्यात आली आहे. तालुक्यातील शेतकर्ºयांनी मोठया प्रमाणात धान पीकाचे उत्पादन केले घेतले शासकीय आधारभुत धान खरेदी केंद्रा अभावी शेतकºयांना त्योच धानपीक कमी किंमतीत व्यापाºयांना विकावे लागत आहे.त्यामुळे शेतकºयांचे आर्थिक नुकसान होत असुन शेतीचा खर्च निघणेसुध्दा अवघड होत आहे.करीता तुमसर तालुक्यात तात्काळ शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी निवेदनातुन करण्यात आली. निवेदन देतांना भंडारा जि.प.चे कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती राजेश उर्फ बालु सेलोकर, तुमसर पंचायत समिती चे सभापती नंदुभाऊ रहांगडाले, उपसभापती हिरालाल नागपुरे, पं.स. सदस्या पल्लवी ताई कटरे, पं.स.सदस्या सुशिला ताई पटले,पं.स. सदस्या निशाताई उके ,विकास फॉउंडेशन चे तालुका अध्यक्ष परमानंद कटरे, शहर प्रमुख मेहताबसिंह ठाकुर, शहर अध्यक्ष गौरव भाऊ नव्वरखेले, माजी सरपंच डोंगरला उमेश बघेले,माजी सरपंच बोरी अविनाश उपरीकर , बालचंद बोन्द्रे, धनराज आगाशे, पंकज राठोड, सागर बिसने व विकास फॉउंडेशन चे कार्यकर्ते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *