तुमसरात जटिल कॅन्सरवर यशस्वी शस्त्रक्रिया!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : कॅन्सरची शस्त्रक्रिया म्हटल कि, कॅन्सरच्या नावानेच पायाखालची जमीन सरकल्यासारखी होते, कॅन्सरचा महागडा उपचार व महागडी शस्त्रक्रिया हि सहसा नागपूर शिवाय लहान शहरात होण्याची शक्यता कमीच, त्यामुळे रुग्णाला व त्यांच्या नातेवाईकांना उपचारासाठी मोठ्या शहरात तारेवरची कसरतच करावी लागते. अशातच एखाद्या रुग्णाला तुमसर सारख्या लहान शहरात उपचार करण्यासाठी कोणी सांगितलं तर विश्वास बसणार नाही. पण विश्वास केला तर सर्व काही शक्य होऊ शकते हे तुमसरातील डॉक्टर सौरभ कुंभारे, सर्जन यांनी सिध्द करुन दाखवत कॅन्सरची जटिल शस्त्रक्रिया करून एका महिलेचे प्राण वाचविण्यात यश आले.

साकोली तालुक्यातील खमार जाम्हळी गावातील शकुनी शेंडे नामक महिला रुग्णाला मागील अनेक दिवसापासून तोंडाला खालच्या जबड्याच्या डाव्या बाजूला एक गाठ होती. त्या गाठिचा उपचार साकोली, भंडारा व नागपुर येथील दवाखान्यात करण्यात आले, पण कोणत्याही डॉक्टरनीकॅन्सर असल्याचे सांगितलं नाही. शेवटी एका रुग्णांकडून नागपूर ला उपचारासाठी गेले असता तुमसर येथील डाक्टर सौरभ कुंभारे यांच्याविषयी माहिती मिळाली व सदर महिलेने तुमसर गाठुन डाक्टर कुंभारे यांना भेटुन तपासणी केली असता, महिलेला कॅन्सरचे सुक्ष्म लक्षण झाले असल्याचे सांगितले व त्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. सदर महिला रुग्णांने ताबडतोब आपरेशनची तयारी दाखवत डॉक्टरांना उपचार करायला सांगितलं.

आपरेशन मध्ये जबडा वाचवुन पुर्ण कैसर काढण्यात येवुन तपासणीसाठी पाठवण्यात आले, तपासणीत ‘साईनाइड लिस्टीक कॅन्सर’ चे निदान झाले. असा कॅन्सर तोंडाच्या व चेहºयाच्या मध्ये शंभर रुग्णापैकी एखाद्याच रुग्णानाला होतो असे सांगितले, तर हा कॅन्सर लवकरच ईतर अवयव व हाडात, फुμफुसात पसरतो. जर याचे लवकर निदान झाले तर हा कॅन्सर आपरेशन नंतर बरा होऊ शकतो, टुथ आपरेशन मध्ये तोंडाचे कॅन्सर काढावेच लागले, सोबतच गळ्यापासुन काही भाग साफ करावे लागते. तिथे हा कॅन्सर पसरु शकतो. सदर रुग्ण महिलेचा कॅन्सर पुर्णपणे निघाला असुन महिला कॅन्सरपासुन मुक्त झाली आहे. तुमसर सारख्या छोट्या शहरात अशा प्रकारची जटिल व दुर्मिळ कॅन्सरची यशस्वी शस्त्रक्रिया पहिल्यांदाच करण्यात आली असल्याने आता तुमसरचे नाव डॉक्टर सौरभ कुंभारे यांनी पटलावर आणले असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरचे कौतुक करत आभार मानले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.