श्री. गो.भु. महिला महाविद्यालयात महिला दिनाचा कार्यक्रम साजरा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : तालुक्यात महिलांसाठी एकमेव शैक्षणिक केंद्र म्हणून प्रचिती असलेला श्रीमती गोपिकाबाई भुरे महिला महाविद्यालय तुमसर येथे सांस्कृतिक विभागाच्या वतीने आज दिनांक ८ मार्च २०२३ ला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ युवराज सेलोकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा विकास मेश्राम उपस्थित होते. महिला दिनानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थिनी प्रिया भोयर, पल्लवी बांधे व अमिषा पडोळे यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपले मत व्यक्त केले.
त्यानंतर महिलांशी निगडित विषयावर भाष्य करताना प्राविकास मेश्राम यांनी कार्यक्रमात उपस्थित असलेल्या महाविद्यालयांच्या विद्यार्थिनींना आवाहन केले, की त्यांनी या दिनाचे औचित्य साधून आपल्या प्रतीकं, प्रथा व परंपरांचा अर्थ समजून घेऊन त्यांचा स्त्रियांवर लादलेल्या दमनकारी व्यवस्थेशी काही संबंध आहे का, आणि असेल तर अशा प्रथा, सामाजिक व सांस्कृतिक गुलामीचे कारणे शोधून त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. ते म्हणाले की महिलांनी सामाजिक व सांस्कृतिक परंपरा व प्रतिकांची जपणूक करून आपण आपल्या दमनकारी व्यवस्थेचे पोषणच करतोय असाच त्याचा अर्थ होतो. तेव्हा आपल्याच गुलामीचापिंजरा मजबूत करण्यात काही अर्थ नाही. आता हा पिंजरा तोडायलाच पाहिजे, असे प्रतिपादन मेश्राम सरांनी केले.
तसेच अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ युवराज सेलोकर सर यांनी महिलांच्या उन्नतीसाठी महिला स्वत:च जबाबदार आहेत आणि त्यांनी नकारात्मक भूमिका सोडून आपल्या प्रगतीचे शिखर गाठावे असे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन डॉ गामा सेलोकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा अशोक चोपकर यांनी पार पाडले. तसेच कार्यक्रमात डॉ अरुणा थूल, प्रा मंगेश वागदे, कुमुद पारधी, मालू पेशने, संजीवनी देशमुख व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित राहुन कार्यक्रम यशस्वी करण्यात सहभाग दर्शविला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *