लोकराजे छत्रपती शाहू महाराज हे देशाचे आदर्श राजे : राहुल डोंगरे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर:-आरक्षण देणारा पहिला राजा, जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाहीत त्यांना एक रुपये दंड ठोटावणारा राजा, कला, क्रीडा, शिक्षण यांना राजाश्रय देणारा राजा, अंधश्रद्धा, कर्मकांडे, दैववाद यावर प्रहार करणारा राजा, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी जाऊन सन्मान करणारा राजा, सर्व क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारा राजा म्हणजे लोकराजे, राजर्षी, छत्रपती शाहू महाराज हे देशाचे खरे आदर्श राजे होते. राज्यकर्त्यांनी, शासन कर्त्यांनी या लोकराज्याचा आदर्श घ्यावा व त्यांच्या विचाराला भारतीय जनतेनी प्रत्यक्ष कृतीतून अनुकरण करावे. तरच खरे अभिवादन ठरेल. असे प्रतिपादन राहुल डोंगरे यांनी केले. ते शारदा विद्यालय वकन्या कनिष्ठ महाविद्यालय तुमसर येथे आयोजित “सामाजिक न्याय दिनानिमित्त”आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष पदावरून बोलते होते.

कार्यक्रमाचे संचालन प्रीती भोयर यांनी केले,तर आभार प्रदर्शन वासू चरडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्योती बालपांडे हया होत्या. यावेळी दीपक गडपायले, श्रीराम शेंडे, संजय बावनकर, रुपराम हरडे, अशोक खंगार, प्रा.नविन मलेवार, नितुवर्षां घटारे, विद्या मस्के, सीमा मेश्राम, प्रा.रुपा रामटेके, प्रा माधवी खोब्रागडे, नारायण मोहनकर, दीपक बालपांडे, झनकेश्वरी सोनेवाने आदि उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *