‘पीओपी बाप्पाला’ यंदा भंडारा जिल्ह्यात ‘नोएन्ट्री’

भंडारा पत्रिका/वार्ताहर चिचाळ : माती मुर्तिकार संघटना जिल्हा भंडारा व कुंभार समाज संघटना भंडारा यांचे संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील पीओपी बंदी साठी केलेल्या आमरण उपोषणाची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील तहसीलदार, नगरपरिषद, प्रदूषण विभाग जिल्हा परिषद, पोलीस अधीक्षक भंडारा व माती मूर्तिकार संघटना भंडारा यांना बंदीचे आदेश देऊन अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहे. पीओपी बंदीसाठी माती मूर्तीकार जिल्हा संघटना व कुंभार समाज संघटनेच्या वतीने गेल्या तीन महिन्यापासून शासन प्रशासनाची उबंरठे झिझवूनही दुर्लक्ष होत आहे.

या अनुषंगाने संघटनेचे वतीने आमरण उपोषणाच्या पुकारले होते, उपोषणाच्या चौथ्या दिवशी डॉ. परिणय फुके यांच्या प्रयत्नाने समस्या समजून जिल्हाधिकारी यांचे कडून पीओपी जिल्हा बंदीचे आदेश मिळवून दिले व लिंबू पाणी तहसीलदार पवनी, भंडारा, लाखनी, लाखांदूर, साकोली, मोहाडी, तुमसर, मुख्याधिकारी नगर परिषद, पंचायत समिती भंडारा, पवनी, लाखनी, लाखांदूर, साकोली, मोहाडी, तुमसर यांना पत्रान्वेय निर्देश देवून पीओपी बंदीची कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. भंडारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात पीओपी बंदीचे आदेश घेण्यासाठी माती मुर्तिकार जिल्हा अध्यक्ष प्रकाश हातेल, माती मुर्तिकार संघटना अध्यक्ष रमेश बुरबादे, श्रीधर सावजर, सुर्यभान वरवाडे, देवदास हटवार, शरद ठिकाणे, सुरेश रुद्राक्षवार, अमर बोरसे, लंकेश कांबळी, लिलाधर तेलमासरे, जीवन शिवरकर, देवेंद्र ठाकरे, दिलीप भेंडारकर, बळीराम वरवाडे, बबन रुद्राक्षवार, ज्ञानेश्वर मानकर, डाकराम भुरे, मोरेश्वर पाथरे, क्रिष्णा ठाकरे, संजय पाठक, लक्ष्मीनारायण लिल्लारे, गोपाल फुंडे, गोपाल भिसे व जिल्ह्यातील मातीमुर्तीकार व कुंभार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ,

दिल्ली यांचे सुधारित मूर्ती विसर्जनासाठी दि.१२/०५/२०२० मार्गदर्शक तत्वे मा. मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाचे रिट पीटिशन क्र. ३१४६/२०२१ नुसार पीओपी मूर्ती बंदीचे आदेश दि. २५/०८/२०२१. सदरहु मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी व मा. न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांविरुद्ध पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, १९८६ च्या कलामांतर्गत कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.या पाश्र्वभूमीवर पीओपी मुर्ती निर्मिती, खरेदी,विक्री, साठवणूकीवर बंदी व जप्तीची कारवाई व पर जिल्हातून पीओपी मुर्ती आयातीवर टोल नाक्यावर जप्तीची कारवाई, मुतीर्चे विसर्जन कृत्रिम तलावात करावे,तर सार्वजनिक मंडळानी पर्यावरण पुरक माती मुतीर्ची स्थापना करावी अन्यथा आदेश, निर्देशनांची पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, १९८६ च्या कलमांतर्गत कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी भंडारा क्र.म.स./संकीर्ण२/कावि/१२४७/२०२३ पत्रान्वेय मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.भंडारा,

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ दिल्ली यांचे सुधारित १२मे २०२० मार्गदर्शक तत्वानुसार जिल्हाधिकारी यांनी भंडारा जिल्ह्यात पीओपी बंदीचे सबंधीतानी तात्काळ अंमलबजावणी करुण जिल्ह्यात जनजागृती करावी व पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ च्या कलमांतर्गत कायदेशिर कारवाई करुन माती मुर्तिकारांना न्याय द्यावा. प्रकाश हातेल माती मुर्तिकार भंडारा जिल्हाध्यक्ष जिल्ह्यात पीओपी बंदी आदेशाचे संपूर्ण जिल्ह्यात कुंभार समाज व मातीमुतीर्कार बांधवाकडून स्वागत आहे. पीओपी हि पर्यावरणाला घातक असल्याने माती मुतीर्चीच स्थापना करावी यासाठी शासनाने जणजागृती करणे गरजेचे आहे.

रमेश बुरबादे कुंभार समाज संघटना जिल्हाध्यक्ष

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.