आज कार्तिक एकादशीनिमित्त मंडई उत्सव

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : कार्तिक एकादशीलाच प्रबोधिनी एकादशी म्हणतात.या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास केला जातो.तुळशीविवाहाची सुरुवात देखील याच दिवसापासून होते आणि कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याची प्रथा आहे.कार्तिकी एकादशीच्या दिवशी मोहाडी येथील नेहरुवार्डतील पंचायत समितीजवळ असलेल्या विठ्ठल-रुख्मिनी मंदिरात तुळशी विवाह पार पडतो आणि नंतर दुस?्या दिवसापासून मोहाडीभर तुळशी विवाहाला प्रारंभ होतो.कार्तिकी एकादशीला या निमित्ताने मंडई उत्सवाचे आयोजन करण्यात येते.युवा जनशक्ती मंडळ पंचायत समिती मोहाडीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावषीर्सुध्दा कार्तिक एकादशीनिमित्ताने मंडई उत्सव कार्यक्रम शुक्रवार दि. ४ नोव्हेंबर २०२२ ला दुपारी ३ ते ७ वाजेपर्यंत मोहाडी तालुक्यातील वडेगाव येथील परमात्मा एक गोंधळ पार्टी शाहीर निळकंठ निंबार्ते यांचा गोंधळ कार्यक्रम होईल.असे आयोजक राजेश हटवार,निखील खोब्रागडे,अक्षय हटवार,भूषण गभने,दुर्गेश गभने सौरभ हटवार,हर्षल तलमले कमलेश हटवार,मिलिंद मोटघरे यांनी कळविले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *