खरबी /नाका येथील स्मशानभूमीचा केला कायापालट

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : ग्रामपंचायत खरबी नाका येथील स्मशानभूमी सौंदर्यीकरण, प्रवेशद्वार बैठक व्यवस्था, वृक्षरोपण, रंगरंगोटी इत्यादी कामाचे लोकार्पण गुरुवार दि. ३ नोव्हेंबर रोजी करून गावकºयांना समर्पित करण्यात आले. यामध्ये लोकसहभाग, १५ वा वित्त आयोग व ग्रामपंचायतच्या संयुक्त सहकार्याने ‘माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ आणि हरित गाव’ या शास्वत विकासाची ध्येय राबविणे अंतर्गत दुर्लक्षित असलेल्या स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण करून गावाच्या विकासात मानाचा तुरा रोवण्यात आला. या प्रसंगी मान्यवर देणगीदार सर्वश्री साई कंपनी, बावनकर लेआउट, अग्रवाल स्टील, गणेश मोथरकर, प्रेमलाल आकरे, सुनिल गिºहेपुंजे, भिमराव घाटोळे, शेखर लीमजे, वंजारी राईस मिल, विनोद धुर्वे यांचे आभार फलकाचे अणावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सौ. रत्नमाला वाडीभस्मे, उपसरपंच संजय आकरे, सदस्य गणेश मोथरकर, तीर्थराज कान्हेकर, सुधीरकुमार मस्के, रंजना मेश्राम, शीतल साकोरे, रजनी आकरे, शिला जंजाळ, माया मोथरकर, पोलीस पाटील मंजुषा मोधरकर, तंमुस अध्यक्ष प्रवीण भस्मे, ग्रामसेवक किशोर लेंडे, कर्मचारी नंदलाल वाडीभस्मे, जयकिसन गायधने, मंगेश हटवार, माधुरी कुंभलकर, सिद्धार्थ कावळे त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्त गणेश वाडीभस्मे, विलास मोथरकर, विनोद हटवार, देवानंद मेश्राम, पुंडलिक हिवसे व गावकरी उपस्थित होते. श्मशानभूमि व गावात बैठक व्यवस्थेकरिता ६६ सिमेंटच्या बोºया देणाºया गावकरी, कर्मचारी पदाधिकारी यांचे ग्रामपंचायत खरबी नाका च्या वतीने विशेष आभार मानण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *