टिप्परची दुचाकीसह ट्रॅक्टरला धडक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : पवनी शहरात मंगळवारी सकाळी रेतीची वाहतूक करणाºया टिप्परने अक्षरश: थरार केला. एका दुचाकीस्वाराला धडक देऊन पळ काढला. पुढे एका ट्रॅक्टरला धडक दिली. हा अपघातग्रस्त ट्रॅक्टर तीन दुचाकींचा चुराडा करीत थेट चहाच्या दुकानात शिरला. दुचाकीचालकाच्या पायाचे हाड मोडले तर चहा दुकानदारासह दोघे जखमी झाले. सकाळी ८:१० वाजताच्या सुमारास हा थरार घडला. पवनी-निलज महामार्गावर हा अपघाताचा थरार अनुभवास आला. रेती रिकामी करून पुन्हा दुसºया खेपेसाठी भिवापूरकडून पवनीकडे वेगात येणाºया टिप्परने (क्रमांक एमएच २७ एक्स ७६१०) नागपूर सावजी भोजनालायसमोर विरुद्ध दिशेने येणाºया दुचाकीस्वाराला धडक दिली. समोरासमोर बसलेल्या या धडकेमुळेचालकासह दुचाकी अक्षरश: हवेत उडून रस्त्याच्या विरुध्द दिशेला जावून पडली. यात दुचाकीस्वाराच्या पायाचे हाड मोडून गंभीर दुखापत झाली. जखमी दुचाकी चालकाचे नाव लोमेश्वर श्रीराम ठाकरे (५०, भिवापूर) असून दुचाकी क्रमांक एमएच ४० बीएच ४२६२ असा आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *