पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्याबाबत मोहाडी नगरपंचायतचे प्रस्ताव सादर

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : येथील नगरपंचायतला पिण्याचे पाणी पुरवठाकरीता सुरनदीला पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्याबाबत प्रस्ताव सादर केला होता तसेचजिल्हाधिकारी नागपूर यांनी प्रस्तावास शिफारस करून मुख्य अभियंता, जलसंपदा यांनी मंजुरी करीता कार्यकारी संचालक, पाटबंधारे विभाग यांच्याकडे सर्व बाबींची पूर्तता करून सादर केलेले होते. भर उन्हाळ्याचे दिवस आलेले असताना वारंवार विनंती करून देखील पिण्याच्या पाण्याकरिता पेंचचे पाणी सोडण्याची बाब प्रलंबित होती. पिण्याच्या पाण्याचा भयंकर प्रश्न लक्षात घेता माजी पालकमंत्री परिणय फुके यांची तातडीने शुक्रवार दि.२१ एप्रिल २०२३ ला भेट घेऊन यांना या संदर्भाचे निवेदन देऊन चर्चा केली.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता परिणय फुके लगेच पाटबंधारे विभागाचे एऊ राजेंद्र कुमार मोहितेशी चर्चा केली तसेच संबंधिताला आपल्या स्तरावरून सूचना देऊन मोहाडी नगरपंचायतक्षेत्रातील पाणीटंचाईचा विषय निवारणाकरिता सोमवार दि.२४ एप्रिल २०२३ ला हिलटॉप नागपूर कार्यालयात बैठक लावली. त्या बैठकीला पाटबंधारे विभागाचे र.ए सोनटक्के, ए.ए झोड, मोहाडीचे मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम, नगराध्यक्ष छाया डेकाटे, उपाध्यक्ष सचिन गायधने, भाजपा जिल्हा पदाधिकारी दिनेश निमकर, भाजपाचे गटनेता व नगरसेवक ज्योतिष नंदनवार, बांधकाम सभापती दिशा दिनेश निमकर, सविता विलास साठवणे उपस्थित होते.

सदर बैठकीत मोहाडीकरिता पाणी सोडण्याच्या विषयावर चर्चा करून नगरपंचायत मोहाडी सोबतच दहा ग्रामपंचायतीचे सुधारित प्रस्ताव भंडारा निवासी जिल्हाधिकारी अभिषेक नामदास यांच्यामार्फत पाठविण्यात आले. याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू माणिकराव कारेमोरे यांनी सुद्धा मोलाचे सहकार्य केले व हा प्रश्न निकाली काढण्यात आला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *