श्रीराम नवमीनिमित्ताने मिलन चौकात रामप्रसादाचे आयोजन

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : राम, लक्ष्मण आणि सीता हे वनवासात राहिले. त्यांनी कंदमुळे, फळे खाल्ली. तिथल्या सर्व अडीअडचणींचा व संकटांचा स्वीकार केला यावरून आपण लक्षात घेतले पाहिजे की आज जी परिस्थिती आहे ती उद्या राहीलच असे नाही. आपल्या दैवाला दोष न देता माणसाने आलेल्या परिस्थितीचा स्वीकार करून त्यातून मार्ग काढला पाहिजे व आपले जीवन आनंदाने जगले पाहिजे. हे रामाच्या वनवासावरून आपल्या लक्षात येते. राम आणि भरत यांचे प्रेम हे आजच्या काळातील भावा-भावांसाठीसुद्धा खूप आदर्श आहे. कारण एक फूट जागेकरिता किंवा शेतीच्या एखाद्या तुकड्यासाठी आज आपण भावा-भावांमध्ये मनमुटाव किंवा अबोलपणा किंवा मारामाºया बघतो. आजच्या युगातील भावांकरता राम आणि भरताचे प्रेम हे आदर्श ठरू शकते. रामाने वानर राजा सुग्रीवाशी मैत्री केलेली आहे. यावरून आपल्या असे लक्षात येते की प्रसंग आला असता, जो जिथे बलवान आहे त्याच्याशी आपल्याला मैत्री करावी लागू शकते व त्याचे सहाय्य आपले कार्य सिद्ध करण्यासाठी घ्यावे लागू शकते. रामाने वानरांचे सैन्य उभारले. म्हणजे मिळेल त्या साधनांचा उपयोग करून माणसाने आपला पराक्रम गाजविला पाहिजे हे यावरून श्रीराम जन्मोत्सव मंडळ राजेंद्रनगर मोहाडीच्या वतीने श्रीराम नवमीनिमित्ताने गुरुवार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मोहाडी येथील राजेंद्रनगरातील स्वयंसिध्द श्रीराम मंदिरातून दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुध्दा श्रीराम नवमीनिमित्ताने शोभायात्रा काढण्यात येणार आहे.

सदर श्रीराम शोभायात्रा मिलन चौकात पोहचताच श्रीरामनवमीनिमित्ताने रामप्रसाद वाटपाला सुरुवात करण्यात येईल. सदर कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष रामा क्षिरसागर, उपाध्यक्ष सोनू मेहर, सचिव पप्पू हटवार, सहसचिव पलाश पाटील, कोषाध्यक्ष नितीन मेहर, सहकोषाध्यक्ष आकाश मोटघरे, टिंकू क्षिरसागर, प्रसिद्धी प्रमुख सुमित क्षिरसागर, पप्पू सोनूलकर, व्यवस्था प्रमुख निहाल मेहर, सहव्यवस्थाप्रमुख कैलास पोटभरे, कार्य.सदस्य प्रणय पाटील, शरद नंदरधने, सागर बारई, गणेश खडतकर, गोकुल पाटील, दिपक बागडे यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. मोहाडी येथील श्रीरामनवमी जमा करण्यात आलेल्या लोकवर्गणीतून रामप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. वनामध्ये कंदमुळे फळे खाऊन आपल्याला राहावे लागले तरी चालेल, संकटांचा सामना करावा लागला तरी चालेल, परंतु माझा पती जिथे आहे तिथेच मी राहील. अशा पद्धतीचा निश्चय सीता बोलून दाखवते. असाच मोहाडी येथील श्रीरामनवमीनिमित्ताने होणारे रामप्रसादकडे मोह- दि.३० मार्च २०२३ ला वर्षे ४ थे रामप्रसाद ाडीवासींकडे परंपरकडे लक्ष वेधले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *