नवरात्रीचे नऊ दिवस…..आमदारांचा सेवाभाव

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : विदर्भाच्या पूर्व टोकावर असलेल्या भंडारा जिल्ह्यातील उत्तर दिशेला असलेल्या मोहाडी येथील गायमुख नदीच्या तीरावर वसलेल्या सुप्रसिद्ध जागृत माता चौंडेश्वरी मातेच्या मंदिरात तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू माणिकराव कारेमोरे यांच्यातर्फे भाविकांना फराळ, चाय, केळी संपूर्ण नऊ दिवस देण्यात आला. अगदी माता चौंडेश्वरी मातेच्या मंदिरात पहाटे ५.१५ वाजता होणाºया आरती पासून आमदार राजू माणिकराव कारेमोरे स्वत: उपस्थीत राहून ते व त्यांचे कार्यकर्ते मंदिराच्या पायथ्याशेजारी मंडपात भाविकांना प्रसाद, केळ, चाय, बिस्किट, प्रसाद इत्यादी अव्याहतपणे देत होते. नवमीला देवीचे दर्शन व घट विसर्जनाला येणाºया भाविकांचा उपवास लक्षात घेता त्यांच्यासाठी भात, पुरी व भाजी व गोड असा महाप्रसाद वाटप करण्यात आला. आजपर्यंतच्या २८ वर्षाच्या इतिहासात नऊ दिवस भाविकांना कोणीही प्रसाद, केळ, चाय व महाप्रसाद खाऊ घातला नाही. दानदाता राजूभाऊ यांच्या सेवाकार्याची दखल मोहाडी तालुका पत्रकार संघाने घेतली. बुधवार दि.४ आॅक्टोबर २०२२ ला सकाळी ९ वाजता आमदार राजूभाऊ कारेमोरे यांचा सत्कार पत्रकार संघाचे अध्यक्ष सिराज शेख व त्यांचे वडील माणिकरावजी कारेमोरे यांचा सत्कार पत्रकार संघाचे कार्यकारी मंडळाचे सदस्य राजू बांते यांनी केला. यावेळी पत्रकार संघाचे दैनिक भंडारा पत्रिकाचे यशवंत थोटे, अध्यक्ष सिराज शेख, सचिव नरेंद्र निमकर, राजू बांते, अफ्रोज पठाण, गिरिधर मोटघरे व राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते. संचालन व आभार प्रदर्शन यशवंत थोटे यांनी केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *