जिल्हाधिकाºयांनी केला स्पर्धकांचा गौरव

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : विदर्भाच्या पूर्व टोकावर असलेल्या भंडारा जिल्ह्यातील उत्तर दिशेला असलेल्या मोहाडी येथील तीर्थक्षेत्र गायमुख नदीच्या तीरावर वसलेल्या सुप्रसिद्ध स्वयंभू माता चौंडेश्वरी मंदिरारात अस्विन शारदीय नवरात्र उत्सवात भरणाºया यात्रेच्या निमित्ताने यावर्षीपासून भव्य रांगोळी स्पर्धाचे आयोजनाची सुरवात करण्यात आली. शनिवार दि.१ आॅक्टोबर २०२२ ला दुपारी २ वाजता सुप्रसिद्ध जागृत माँ चोंडेस्वरी देवीच्या सभागृहात भव्य रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये कु.चारुलता लेखीराम थोटे हिला प्रथम क्रमांकाचे रोख पारितोषिक रमेश गोन्नाडे व नरेंद्र निमकर यांच्याकडून देण्यात आले. कु.रानु लेखीराम थोटे हिला दुसºया क्रमांकाचे रोख पारितोषिक विनोद पातरे व गिरीधर मोटघरे यांच्याकडून देण्यात आले. कु.प्रांजली महादेव मोटघरे हिला तिसºया क्रमांकाचे रोख पारितोषिक विनोद पातरे व स्व.ललिता उदारामजी थोटे दुसºया स्मृतीप्रीत्यर्थ रवि उदारामजी थोटे यांच्याकडून रोख पारितोषिक देण्यात आले. सोमवार दि.३ आॅक्टोबर २०२२ ला सायंकाळी ७ वाजता माँ चौंडेश्वरी माता मंदिर कमेटीचे अध्यक्ष प्रेमरतन दमानी, उपाध्यक्ष एकानंद समरीत, सचिव रमेश गोन्नाडे, सहसचिव हर्षल गायधने, कार्य.सदस्य बाळू बारई, उमाशंकर बारई, अशोक कारंजेकर, संजय श्रीपाद, किशोर पातरे, नवरात्र उत्सव समिती अध्यक्ष विनोद पातरे यांच्या उपस्थितीत भंडारा जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी रागोळी स्पर्धकांचा गौरव केला. तसेच भव्य रांगोळी स्पधेर्चे यशस्वी परीक्षण केल्याबद्दल अश्विनी पलाश पाटील, राणी गिरधर मेहर, जयश्री तुषार पराते यांचा माँ चौंडेश्वरी माता मंदिर कमेटीचे अध्यक्ष प्रेमरतन दमानी यांच्या शुभहस्ते आभारपत्र देण्यात आले. जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी कुटुंबातील सदस्यसोबत माँ चौडेश्वरी देवीचे विधिवत पूजन करून दर्शन घेतले. कार्यक्रमाचे संचालन व आभार दैनिक भंडारा पत्रिकाचे यशवंत थोटे यांनी मानले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *