अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून केले गर्भवती

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- येथील पोलिस ठाण्याचे हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलगी असल्याचे माहिती असतांनाही तिला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार करून गर्भवती केल्याची घटना रविवारी(ता.१२) रोजी उघडकीस आल्याने पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून लाखनी पोलिसांनी लैंगिक अत्याचार व पोस्को कायद्याचे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. आरोपीचे नाव लक्ष्मण जयश्रीराम शरणागत(२७) रा. मोहगाव, तालुका तुमसर, जिल्हा भंडारा असे आहे. आरोपी हा त्याच्या सहकाºयांसह पिडीत कुमरिकेच्या गावात एका गोशाळेत खोली भाड्याने घेऊन वास्तव्यास होता. ओळखीचा फायदा घेऊन पिडीत अल्पवयीन असल्याची माहिती असून सुद्धा तिला लग्नाचे आमिष दाखवून २१ जानेवारी ते १ मार्च २०२३ दरम्यान पिडीत मुलीसोबत वारंवार लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याची बाब पिडीतेने कुटुंबीयास सांगितले. गावात बदनामीच्या भीतीपोटी कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली नाही. पण गर्भवती असल्याचे समजताच लाखनी पोलिस ठाणे गाठून पोलिसाना घडलेला प्रकार सांगितल्याने पिडीतेच्या आईचे फिर्यादीवरून लाखनी पोलिसांत कलम ३७६(२) (एन), ३७६ (२) (जे), ३७६ (३) भादवि तथा बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ चे सहकलम ४,६ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास लाखनी पोलीस करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *