सडक अर्जुनीचे गोंडवाना क्रीडा मंडळ प्रथम तर सीतासावंगीचे नवयुवक क्रीडा मंडळ द्वितीय

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : आजादी का अमृत महोत्सवानिमित्त स्व.डॉ.बाबुराव मेंढे स्मृती प्रतिष्ठान भंडाराच्या वतीने भंडारा व गोंदिया लोकसभा क्षेत्रातील खासदार सुनिल मेंढे यांच्या प्रयत्नातून गुरुवार दि.९ ते १९ मार्च २०२३ खासदार क्रिडा महोत्सव आयोजन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत मोहाडी शहरात प्रथमच खासदार पुरुष कबड्डी स्पर्धाचे आयोजन करण्यात आल्याने मोहाडीवासीमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. मोहाडी येथील बायपास रोडवरील सराई हनुमान मंदिराजवळील हुतात्मा स्मारकच्या भव्य पटांगणावर भंडारा व गोंदिया लोकसभा क्षेत्रातील पुरुष कबड्डी स्पर्धा शुक्रवार दि.१०, ११ व १२ मार्च २०२३ ला सतत सायंकाळी ५ ते १० वाजेपर्यंत तीन दिवसीय स्पर्धा घेण्यात आली. भंडारा व गोंदिया लोकसभा क्षेत्रातील जवळपास सर्वच तालुक्यातील सहभाग घेतला. यामध्ये महेंद्र गभने, प्रो.कबड्डीपटू आकाश नत्थू पिकलमुंडे, निलेश दुधराम गाढवे, रोशन समरीत यांच्या नेतृत्वाखाली (अ) गट विद्युत क्रिडा मंडळ मोहाडी, समस्त एकलव्य किडा मंडळ पालोरा, शिवमुद्रा किडा मंडळ आंधळगाव, विर बिरसामुंडा क्रिडा मंडळ तिरोडा. (ब) गट बहुउदेशिय क्रिडा मंडळ मोहाडी, विद्यार्थी किडा मंडळ विहिरगांव, नवयुवक क्रिडा मंडळ सितासावंगी, फौजी बहुउद्देशिय क्रिडा मंडळ वडेगाव, बालगणेश किडा मंडळ ढाकणी. (क) गट युवा संभाजी क्रिडा मंडळ आंधळगाव, स्टार नेहरु युवा मंडळ वडेगाव, बहुउद्रदेशिय किडा मंडळ रोहा, गाडगेबाबा किडा मंडळ गोंदिया. (ड) गट विजय किडा मंडळ भंडारा, संत कमलदास क्रिडा मंडळ डोगरगांव, विर मराठा किडा मंडळ खापा, युवा संताजी क्रिडा मंडळ सिल्ली, मॉ.दत्तेश्वरी क्रिडा मंडळ गोरेगाव. (इ) गट युगांधर किडा मंडळ सिहोरा, समस्त ग्रामवासी मंडळ कान्हळगांव, महासती बेनाबाई क्रिडा मंडळ कुर्झा, वैनगंगा स्पोर्टिंग किडा मंडळ बाम्हणी, मॉ.काली किडा मंडळ बनगाव, सुभाष क्रिडा मंडळ मांढळ. (फ)गट स्टार किडा मंडळ सिरसोली, स्वराज क्रिडा मंडळ डोगरगांव, वैनगंगा क्रिडा मंडळ पारडी, समस्त ग्रामवासी मंडळ कान्हळगांव, गोडवाना किडा मंडळ सडक अर्जुनी असे २९ संघ आणि ३४८ कबड्डीपटू सहभागी झाले होते.

यानिमित्ताने शनिवार दि.११ मार्च २०२३ ला रात्री १० वाजता मोहाडी येथील नेहरूवार्डतील रहिवासी स्व.देवचंद शिवराम आगाशे यांच्या द्वितीय स्मृतीत ९३० एनर्जी ड्रिंकचे बॉटल वाटप करण्याºया पराग देवचंद आगाशे यांचा खासदार सुनील मेंढे यांनी सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. रविवार दि.१२ मार्च २०२३ ला रात्री १० वाजता पंच अधिकारी म्हणून मुकेश कांबळे, मंगलदिप गभने, जितेश देशमुख, शुभांगी तुमसरे मुंडीकोटा, गणेश ठवकर, राकेश ठवकर, लंकेश पडोळे, रामेश्वर चाचीरे, रोहित लक्सने, प्रकाश सेलोकर, पंच प्रमुख पुरुषोत्तम सेलोकर, मधु गायधने, दिनेश टेकाम, राजेश मेश्राम, स्पर्धा निरीक्षक विनायक वाघाये यांचा शुभांगी सुनिल मेंढे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. गोंडवाना क्रीडा मंडळ सडक अर्जुनीचे प्रशिक्षक जितेंद्र गाढवे, व्यवस्थापक लक्ष्मीकांत गाढवे, कप्तान ईश्वर उईके, शुभम मेंढे, अविनाश उईके, कपिल मरसकोल्हे, पुर्वेश मडावी, होमराज वाढई, हेमंत मरसकोल्हे, सचिन खांडवे, तेजस नेताम, विजय मरसकोल्हे, पंकज मडावी यांनी प्रथम क्रमांक ५१ हजार रुपये तर नवयुवक क्रीडा मंडळ सीतासावंगीचे ईश्वर हरिलाल उईके, रोहित रवी डहाके, अखिल वाघाडे, बादल झंझाड, राहुल गाढवे, संजय शिवरकर, अभय सलाम, सचिन भोयर, प्रजत कालेकर, महेंद्र मरकाम यांनी ३१ हजार रुपये द्वितीय क्रमांक पटकाविला.विजय क्रीडा मंडळ भंडाराचे प्रशिक्षक प्रमोद लेंडे, व्यवस्थापक रमेश ढेंगे, कप्तान आकाश बुरडे, गणेश गायधने, महेश गायधने, रितिक बुरडे, अनिकेत वैद्य, अनमोल बोरघरे, लोकेश काठेवार, सागर दांडवे, रवि मडावी, रोहित मडावी, कलश ढेंगे यांनी २१ हजार रुपये तिसरा क्रमांक पटकाविल्याबद्दलशुभांगी तुमसरे मुंडीकोटा यांच्या शुभहस्ते उत्कृष्ट कबड्डीपटूना रोख पारितोषिक देण्यात आले.

मोहाडी येथील विद्दुत कामगार स्पोर्टिंग क्लबचे प्रशिक्षक नत्थू पिकलमुंडे, विनायकराव वाघाये, पुरुषोत्तम सेलोकर, संदीप गभने, रमेश ढेंगे, सुधीर पडोळे पारडी, उपेंद्र गभने, संतोष समरीत डोंगरगाव, शरद बुधे आंधळगाव यांचा नगराध्यक्ष छाया डेकाटे, उपाध्यक्ष सचिन गायधने, नगरसेविका सविता विलास साठवणे, दिशा दिनेश निमकर, अस्विनी प्रविण डेकाटे, राणी गिरीधर मेहर, रिता रविकांत देशमुख, तेजस मोहतुरे, शैलेष गभने, ठाणेदार प्रदीप पुल्लरवार, स्नेहलता पुल्लरवार, उपनिरीक्षक लक्ष्मण जाधव, कातीकराम दुधकावरा यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक दैनिक भंडारा पत्रिकाचे यशवंत थोटे यांनी केले तर संचालन व आभार प्रदर्शन सुधीर पडोळे यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी नगरपंचायतचे अधिकारी पदाधिकारी, कर्मचारी, मोहाडी नगरवासीयांनी आणि कबड्डीप्रेमींनी उत्स्फूर्तपणे सहकार्य केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *