इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला आग

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- शहरातील कुमार पेट्रोल पंप लगत असलेल्या रुद्र इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाला आग लागून दुकानात असलेले इलेक्ट्रिक साहित्य जळून खाक झाल्याची घटना सोमवारी (ता.५) रात्री ११ च्या सुमारास घडली. पोलिसांनी व परिसरातील नागरिकांनी मिळेल त्या साहित्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले तर तब्बल ३० मिनिटे उशिरा नगरपंचायतीचे अग्निशमन वाहन घटनास्थळावर पोहोचले. शिवनगर मुरमाडी सावरी येथील रहिवासी रुपेंद्र बिसणे यांचे राष्ट्रीय महामार्ग लगत रुद्र इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल्स नावाचे दुकान असून दुकानात इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्री व दुरुस्तीचे काम केले जाते सोमवारी (ता.५) रात्री ८ वाजताच्या सुमारास दुकान बंद करून रूपेंद्र आपल्या घरी गेले. रात्रीच्या सुमारास दुकानातून धूर निघत असल्याची माहिती परिसरात फिरणाºया नागरिकांनी घरमालकाला दिली घरमालकाने घटनेची माहिती दुकानदारांना दिली. तात्काळ रूपेंद्र यांनी दुकानाच्या तालात खोलून दुकान उघडले असता आगीचे रौद्ररूप धारण केलेले दिसले.

तात्काळ मिळेल त्या साहित्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. घटनेची माहिती लाखनी पोलीस स्टेशन व नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाला देण्यात आली घटनास्थळी लाकडी पोलीस अवघ्या ०३ मिनिटात तर नगरपंचायतीचे अग्निशमन वाहन तब्बल ३० मिनिटे उशिरा घटनास्थळावर पोहोचले तोपर्यंत पोलिसांनी व उपस्थित नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले. नगरपंचायतीचे अग्निशमन वाहन आल्यानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात आले. या आगीत दुकानातील जवळपास सर्वच इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स साहित्य जळून खाक झाले तर काही साहित्य बेकामी झाले. घटनास्थळावर सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश गोसावी पोलीस हवालदार संजय अरकासे, पोलीस शिपाई निशांत माटे यांनी भेट देऊन नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले. शॉर्ट सर्किट मुळे आग लागली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत असून वृत्तलीहिपर्यंत नुकसानीचा आकडा कळू शकला नाही.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *