राष्ट्रीय महामार्ग बांधकामात ‘डस्ट’ च्या वापरामुळे धुळीचे साम्राज्य

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : राष्ट्रीय महामार्गावर मुंडीपार सडक ते जाभंडी फाट्यापर्यंत अग्रवाल ग्लोबल इन्फ्राटेक प्रा.लि. कंपनीतर्फे महामार्गावरील चौपदरीकरणाच्या निर्माणकार्यामध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात येत असून बांधकामाच्या निर्माण कार्यावर प्रश्नचिन्ह उभे होत आहेत. निर्माण कार्यामध्ये पावर प्लांट मधील वेस्टेज डस्ट चा वापर करण्यात येत असून या डस्ट ची धूळ महामार्गावरील वाहतुकीमुळे रस्त्यावर उडत आहे. येणाºया जाणाºया वाहनधारकांना डस्ट च्या धूळ मुळे सामोरील दृश्य दिसत नसल्याने अपघात होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. निर्माण कार्य करीत असताना संबंधित कंत्राट दराने वाहतुकीकरिता सुरक्षिततेच्या उपाययोजना न केल्यामुळे मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रीय महामार्गावरील मुंडीपार सडक ते जांभळी फाट्या पर्यंत अनेक वर्षापासून या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव वन कायद्यामुळे प्रलंबित होता. यावर्षी या मार्गाच्या निर्माण कार्याला मंजुरी मिळाली असून त्याचे कंत्राट अग्रवाल ग्लोबल इन्फ्राटेक प्रा.लि. कंपनीला देण्यात आले आहे. मात्र कंपनीतर्फेनिर्माण कार्य कासव गतीने सुरू आहे. वाहन चालकांना आपला जीव मुठीत घेऊन वाहनचालवावे लागत आहे .

राष्ट्रीय महामार्गावर जंगलव्याप्त परिसरातून दुहेरी वाहतूक असून मागार्चे निर्माण कार्य सुरू असल्यामुळे मार्गाच्या दोन्ही बाजूच्या कडा (बाजू ) ह्या कमजोर झालेल्या असल्यामुळे मार्गाच्या बाजूला वाहन उतरल्यास नेहमी अपघात होतात वाहने उलटतात तर चार चाकी व दुचाकी घसरून खाली पडतात यामुळे अनेकांना जीव गमवावा लागतो तर गंभीर रित्या जखमी होऊन अपंगत्व येते कंत्राटदार कंपनीने या मार्गाचे निर्माण कार्य करताना सुरक्षिततेच्या उपाययोजना न केल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. जंगल व्याप्त क्षेत्र असून महामार्गावर वन्य प्राण्यांचे विचरण होत असते. याकरिता सुरक्षिततेचे उपाय न केल्यामुळे वन्य प्राण्यांचे जीव धोक्यात आल्याचे चित्र आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वन्य प्राण्यांकरिता व वाहतुकीकरिता स्थायी सुरक्षित उपायोजना करण्याचे निर्देश संबंधित कंत्राटदाराला द्यावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे . महामार्गावरील खड्डे थातूरमातूर पद्धतीने बुजविण्याचे काम केल्याने पुन्हा खड्डे जैसे थे ची परिस्थिती आहे. खड्डे बुजविण्याकरिता वापरण्यात येत असलेल्या चूरीमुळे दुचाकी वाहन घसरून अपघात होत आहेत. खड्ड्यात नुसती चूरी टाकण्यात येते व ती एकाच दिवसात खड्ड्याच्या बाहेर निघते व पुन्हा खड्डा जैसे थे च्या स्थितीत येते. मुंबई ते कलकत्ता या राष्ट्रीय महामार्गावर दररोज हजारोच्या संख्येत वाहनांची ये जा सुरू असते शासन या वाहना च्या माध्यमातून कोट्यावधीच्या महसूल प्राप्त करते. परंतु वाहनधारकांच्या आवश्यक सुविधा सारख्या रस्त्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *