शेतकºयांच्या खात्यात अतिवृष्टीचे पैसे तात्काळ जमा करा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पवनी : पवनी तालुक्यात २०२२ ला पावसाळा ऋतुमध्ये फार मोठया प्रमाणात अतिवृष्टी व गारपीट झाली वरुणराजा शेतकरी राजावर कोपला शेकºयांच्या शेतात लावलेल्या पिकांचे नायनाट करून गेला शेतकरी राजा शेतात चार महिने राब राब राबला ऐन कापणीच्या वेळी वरुणराजाच्या प्रकोपाने शेतातील पिके मातीमोल झाली. १०% पिकांची आशा होती परंतु पुन्हा एकदा मावा, तुळतुळा सारख्या रोगाने संपूर्ण पिकेच नष्ट केले या सर्व शेतकºयाची अवस्था लक्षात घेऊन राज्य सरकारने अतिवृष्टीची नुकसाणभरपाई शासनाच्या नियमाप्रमाणे हेक्टरी १३६०० रु. घोषित केले, तलाठ्याच्या माध्यमातून सर्वे करण्यात आला आणि तालुक्याच्या ठिकाणी पैसे आले परंतु अजूनपर्यंत संपूर्ण शेतकºयांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही. याप्रकरणाची दखल घेत भोजराज वैद्य यांनी तालुका गाठुन तहसीलदार मॅडमला शेतकºयांच्या खात्यात तात्काळ पैसे जमा करण्यात यावे, अशी विनंती करून निवेदन दिले. लवकरात लवकर पैसे जमा न झाल्यास तहसील कार्यालया सामोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला. त्याप्रसंगी जबाबदार प्रशासन राहील असे सांगितले. याप्रसंगी भोजराज वैद्य, चेतन पडोळे, किशोर वैद्य, चंद्रशेखर पडोळे, जगदीश वैद्य, ज्ञानेश्वर देशमुख, रमेश बावणकर, श्रीधर वैद्य, ईश्वर मानापुरे, सुनील वैद्य, अशोक रामटेके, श्रीकृष्ण बावणकर, पोमेश वैद्य, विष्णू वैद्य, परमानंद वैद्य, दूधराम पडोळे, वामन बावणकर, चित्रगुप्त पडोळे, अशोक रामटेके, सदानंद वैद्य, नितेश जुमळे, भूपेश वैद्य, रामेश्वर वाडिभश्मे, मुकुल रामटेके, रत्नाकर रामटेके, प्रभू वैद्य, शंकर मेश्राम, मारोती मेश्राम, योगेश्वर पडोळे, गणेश खांदाडे, दीपक बावणकर, हर्षद वैद्य, प्रणय वैद्य, सुरेश पडोळे, कुंदन पडोळे, भोजराज वाडीभस्मे, नारायण वैद्य, नितेश बरसागडे व तालुक्यातील सर्व नागरिक उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *