ग्रामीण भागात कौलारु घरे छावण्याची लगबग

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मुरमाडी : पावसाचे आगमन होण्यापूर्वी खेडेगावात घरावरती असलेले छपर व्यवस्थित करण्याची धडपड सुरू झाली आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कौलारू घरे होती. परंतु, अलीकडे मोठ्या प्रमाणात सिमेंट काँक्रीकटचे छत असलेली घरकुले झाली. कवेलूची घरे कमी झाली. तरीही कौलारू घरे बहुतांश ग्रामीण भागात आहेत. आज शहरासह खेडेगावही बदलत चालले आहे. खेड्यातील कौलारू घरासह इतरही अनेक बदल होताना पहावयास मिळत आहे. दरवर्षी पावसाळा सुरू होण्याआधीच कौलारू घरांची डागडुजी करणे गरजेचे असे यालाच घर फेरणे किंवा छावणे असे म्हणतात. आज घर फेरणारे कारागीरही दुर्मीळ झाले आहेत.

कौलारू घर उन्हाळ्यातही गरम होत असून नाही. आजही खेड्यातपावसाळ्यापूर्वी कौलारू घरे साकारण्याचे काम केले जाते. ग्रामीण भागात पावसाळ्यापूर्वी लोकांनी घरे छावण्यास सुरुवात केली असून बाबूंच्या बांबूच्या काड्या बदलण्याबरोबरच कवेलूंची करत आहेत. यंदा मजुरांची कमतरता असल्याने दुरुस्तीच्या कामावर परिणाम होत आहे. पावसाळ्यामुळे लोकांना आता घरे छावण्याची चिंता लागली आहे. हवामानात वारंवार बदल होत आहे. शेतकºयांनी मशागतीची तयारी सुरू केली आहे. अशा स्थितीत घर छावण्यासाठी मजुरांची कमतरता आहे. याशिवाय कामावर येणारे मजूर, पावसाळा जवळ आल्याने लवकरात लवकर घरे दुरुस्त करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

काळानुसार बदल

आजच्या बदललेल्या युगात कौलारू घरांचे अस्तित्व केवळ खेड्यापाड्यांत टिक- ून आहे. ग्रामीण भागातही लोक आता कवेलूऐवजी पक्की घरे बांधू लागले आहेत. एक काळ असा होता की पावसाळा आला की, कवेलू बनवणान्यांना उसंत मिळत नव्हती. पण आज परिस्थिती अशी आहे की, कवेलूंची मागणी कमी झाली आहे. आधुनिक युगात सर्वत्र सिमेंटच्या इमारती बांधल्या जात आहेत. शिवाय आता कवेलू बनविणारे मजूरही मिळत नसल्याने ग्रामीण भागातही कवेलूंची घरेही कमी होत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *