किराणा दुकानातून सुगंधीत तंबाखू जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : साकोली पोलीसांनी तालुक्यातील सेंदुरवाफा येथे एका किराणा दुकानात धाड टाकुन १८ हजार ९९८ रूपयांचा प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु जप्त केला. सेंदुरवाफा येथील पालीवाल किराणा व क्लॉथ स्टोअरमधून प्रतिबंधित असणारी तंबाखूची विक्री होत असल्याची गुप्त माहिती साकोली पोलिसांना मिळाली .त्या आधारे दि.१९ आॅक्टोबरला दुपारी १ वाजेच्या सुमारास साकोली पोलीसांनी सदर किराणा दुकानावर धाड टाकून १८ हजार ९९८ रुपये किमतीची प्रतिबंधित सुगंधीत तंबाखू जप्त केली . दुकानाची झडती घेतली असता विविध प्रकारच्या प्रतिबंधित तंबाखू दुकानात मिळाली असून त्याचे वजन सहा किलो ८०० ग्राम असून किंमत १८ हजार ९९८ रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे . दुकान मालक राहुल पालीवाल याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक श्री .सेलोकर, प्रशांत गुरव अमितेश वडेट्टीवार,व संगीता मडावी हे करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *