वाघाच्या हल्ल्यात दोन गुराखी ठार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मूल : चिचपल्ली वनपरिक्षेत्रांतर्गत येणाºया कवळपेठ परिसरातील जंगलात चिचाळा येथील दोन गुराख्यावर बुधवार, १९आॅक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास वाघाने हल्ला करून त्यांना जागीच ठार केल्याची घटना घडली. चिचाळा येथील नानाजी निकेसर (५३) व ढिवरू वासेकर (५५) असे मृतकांची नावे आहेत. हे दोघेही गावातील गुरे चारण्याकरिता सकाळी जंगलात गेले होते. तिथे दबा धरून बसलेल्या वाघाने या दोघांवर हल्ला केला आणि त्यांना जागीच ठार केले. ही घटना गावात माहीत होताच गावकºयांनी घटनास्थळी धाव घेतली व वनाधिकाºयांना कळविले. चिचपल्ली वनपरिक्षेत्राच्या वनपरिक्षेत्राधिकारी प्रियंका वेलमे व मूल वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम नायगमकर यांनी आपल्या कर्मचाºयांना सोबत घेऊन घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून दोन्ही मृतदेहाचा व परिसराचा पंचनामा केला व त्यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मूल उपजिल्हा रुग्णालय येथे पाठविले. वनपरिक्षेत्राधिकारी वेलमे यांनी मृतकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ३०हजार रुपयांची सानुग्रह मदत दिली व कुटुंबीयांचे सांत्वन केले. मागील काही दिवसापासून मूल तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाघाचे हल्ले होत असल्याने गावकरी दहशतीत आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर शेतकरी असून, शेतीच्या कामासाठी गोधन वापरले जाते. जंगल परिसरातील नागरिक व गुरांवर मोठ्या प्रमाणात हल्ले होत असल्यामुळे आता या जनावरांना चारायचे कुठे, असा प्रश्न या शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे. वारंवार होत असलेल्या हल्ल्यामुळे नागरिकांनी वनविभागावर प्रचंड रोष व्यक्त केला आहे. तात्काळ वाघांचा बंदोबस्त करून जंगलव्याप्त परिसरातील नागरिकांना न्याय द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *