कांद्री शेतशिवारात अजगर सापाला जीवनदान

तालुका प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यातील आंधळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सोमवार दि.१३ फेब्रुवारी २०२३ ला सकाळी १०.३० च्या सुमारास शेतकरी अनिल सोनवणे यांच्या शेतावर अजगर प्रजातीचा साप आढळून आला. त्यांनी कांद्री येथील सर्पमित्र चेतन चोपकर, राजू पिलारे, प्रशिक मेश्राम, वैभव बागडे यांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली. त्यांनी लवकरच घटनास्थळी पोहचून अजगर प्रजातीच्या सापाला पकडून कांद्री वनपरीक्षेत्र यांच्याकडे सोपविले. त्यांनी अजगर या सापाचे वजन लांबी मोजून नोंद केली आणि रोंगा या जंगलात अजगर या प्रजातीच्या सापाला सोडून जीवनदान दिले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *