अण्णाची महराज जयंतीनिमित्त दोन दिवस विविध कार्यक्रम

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, दामोधर महाराज, अण्णाजी महाराज, शंकर महाराज, सत्यपाल महाराज यांच्या पावनस्पर्शाने पुनीत झालेल्या कान्हळगावच्या तपोभूमीत परमपूज्य अण्णाजी महाराज यांची जयंती गुरुदेव सेवा मंडळ व गावकºयांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे. दिड हजार लोकवस्ती असणाºया मोहाडी तालुक्यातील कान्हळगावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, दामोधर महाराज, अण्णाजी महाराज, शंकर महाराज, सत्यपाल महाराज या संताचे विचार आजही या गावाला चैतन्य, प्रेरणा देणारे आहे. १९३४ साली अण्णाजी महाराजांनी गावकºयांना भक्ती मार्गाकडे वळविले. अण्णाजी कान्हळगावात १४ वर्ष वास्तव्याला होते. माजी सभापती प्रीतलाल सवालाखे, रामचंद्र कूकडकर, रामचंद्र नखाते, तुळशीराम बांते, बळीराम लेदे ही प्रमुख मंडळी होती. ही मंडळी आता हयात नाहीत. १९४९ रोजी जातीय एकता निर्माण होण्यासाठी सहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील सर्व जाती-धर्माचे लोक सहभोजनात सहभागी झाले होते. या स्तुत्य कार्यक्रमाची दखल प्रशासनाने घेतली होती. भंडारा जिल्ह्यात सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कान्हळगावात आले होते. अण्णाजी महाराज, स्वामी सीतारामदास महाराज यांच्या सहयोगाने १९३६ मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कान्हळगावात आले होते. राष्ट्रसंत तुकडोजी यांच्या भजन खंजीरीतून निनादाचा आस्वाद अनेकांना घेता आला. स्वच्छता, अस्पृश्यता निवारण, अंधश्रध्दा निर्मूलन या विषयावर मार्गदर्शन झाले होते. गावात नवचैतन्य निर्माण झाली होते. राष्ट्रसंतांच्या प्रेरणेने १९३७ साली गुरुदेव सेवा मंडळाची कान्हळगावात स्थापना करण्यात आली. आजही गुरुदेव सेवा मंडळ आहे. गावातील लोकांनी श्रमदानातून गुरुदेव सेवा मंडळाची इमारत उभारली होती. तपोभूमीत दरबार नामक इमारतही तयार करण्यात आली. उंबरीच्या झाडाखाली कुटी होती. त्या कुटीत अण्णाजी महाराज राहत होते. उंबराचे झाड आजही कायम आहे. तिथे अण्णाजी यांची तपोभूमी तयार करण्यात आली. पूर्वी कान्हळगावात रामधून निघत होतय. सहकार्य, सेवाभाववृत्तीची बीजे कान्हळगावात पेरणी झाली होती. १९४२ च्या दरम्यान स्वातंत्र आंदोलनाने जोर पकडला होता. याच वेळी कान्हळगावात विश्वशांती सप्ताह पार पडला. अण्णाजी महाराज कान्हळगावात रममान असताना स्वामी सीतारामदास महाराज यांनी अण्णाजींना नरसिंह टेकडी माडगी येथील वैनगंगेच्या सानिध्यात योगसाधना करण्याची प्रेरणा दिली. अण्णाजी महाराज कान्हळगावातून १९४९ ला माडगी येथे गेले. त्यांचे काही काळानंतर टेकडीवर देहावसान झाले. दरवर्षी कान्हळगावात अण्णाजी महाराज यांची जयंती उत्सव रामदास नवमीला साजरा केला जातो. यावर्षी १४ व १५ फेब्रूवारी रोजी अण्णाजी यांची १२२ वी जयंती साजरी केली जात आहे. या निमित्त ग्रामसफाई, सामूहिक ध्यान, कीर्तन, सामुदायिक प्रार्थना, संबोधन व गोपालकाला याचे आयोजन करण्यात आले आहे. सामुदायिक जीवनाची संस्कृती जपणाºया कान्हळगावात तपोभूमीवर गुरुदेव सेवा मंडळाचे सेवकगण प्रार्थना करीत असतात. यात बालमंडळी उपस्थिती असते. अशा या कान्हळगावच्या संतभूमीला संतांची तपोभूमी म्हणून ओळखली जाते. या गावाला संतमंडळींनी आदर्श ग्रामची पावती दिली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *