तंबाखूजन्य पदार्थ खाणाºया ६५० जणांवर कारवाई

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत ६५२ लोकांवर कोटपा कायदयातंर्गत कारवाई करण्यात आली असून एकुण एक लाख वीस हजार पस्तीस रूपयांचा दंड वसुल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयाने दिली आहे. येणाºया पिढीला तंबाखू व तंबाखूजन्य पदाथार्पासून दूर राहावी यासाठी शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी पोलीस विभाग,शिक्षण विभाग ,सलाम फांऊडेशन,आरोग्य प्रबोधीनी संस्थेव्दारे जिल्हयात तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येतो. काल जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत राबविण्यात आलेल्या बाबींचा सविस्तर आढावा घेतला.

यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.दिपचंद सोयाम,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मिलींद सोमकुंवर हे प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हयात एकुण १३२९ शाळांमध्ये तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.१९३3 शाळा तंबाखूमुक्त झाल्या असुन या कार्यक्रमाव्दारे विद्यार्थी व्यसनापासून दूर राहत आहेत.जिल्हयातील अन्य शाळा-महाविदयालयांमध्ये पोलीस व शिक्षण विभागांनी अचानक भेटी देवून या अभियानाच्या यशस्वीता तपासण्यात यावी असे निर्देश जिल्हाधिकाºयांनी यावेळी दिले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *