सोशल मीडियाचा योग्य वापर करावा – लोहित मतानी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त सोमवार दि. १४ नोव्हेंबर रोजी युवा रुरल असोसिएशन संचालित चाईल्ड लाईन भंडाराच्या वतीने बालक मेळाव्याचे आयोजन जिल्हा परिषद भंडारा येथील सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमा प्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी सांगितले की, हे युग तंत्रज्ञानाचे युग असून इंटरनेट वापरून संपूर्ण जगाशी अनेक वेबसाईटच्या माध्यमातून माहिती हस्तांतरित करण्याची आणि जगभरातील लोकांशी संवाद साधण्याच्या क्षमतेमुळे सोशल मीडिया हे आजच्या परिस्थितीत एक प्रचलित माध्यम आहे. फेसबुक, ट्रिटर, इंस्टाग्राम असे अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जगभरात पसरलेल्या लोकांना काही सेकंदात एकमेकांशी जोडतात. इंटरनेट वापरून संपूर्ण जगाशी अनेक वेबसाईट च्या माध्यमातून माहिती हस्तांतरित करण्याची आणि जगभरातील लोकांशी संवाद साधण्याच्या क्षमतेमुळे सोशल मीडिया हे आजच्या परिस्थितीत एक प्रचलित माध्यम आहे. सोशल मीडियामुळे संपूर्ण जग आपल्या बोटांच्या टोकावर आहे. विशेषत: बालकांपासून तर थोरांपर्यंत हा सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर करणाºयांपैकी एक आहे.

आजकाल आपण अशी अनेक उदाहरणे सुद्धा पहिली आहे, जिथे काही तासात सोशल मीडियामुळे लोकांना प्रसिद्धी मिळाली आहे. अशा प्रकारे कोणतीही गोष्ट आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात पोहोचलेली गोष्ट सर्व काही चांगली असू शकत नाही. जसे सोशल मीडिया चांगला आहे, तसे त्याचे अनेक तोटे सुद्धा आहेत. या तंत्रज्ञानाच्या युगात आजची पिढी ही भरकटलेली आहे. आपल्या जीवनाचा हेतू साध्य करण्यापासून दूर जात आहे. मोठ्या लोकांचा अनुकरण करून लहान बालके हे सोशल मीडियाच्या आदिन झाले आहेत. यामुळे पुस्तकी ज्ञानापासून दूर जात असून सोशल मीडियावर रिल्स बनविण्यात व्यस्त आहेत. यामुळे अनुचित कळत नकळत घटना घडत असतात. यामुळे बालक हा गुन्हे करीत आहे, आता समाजात सर्वात जास्त बालक हे गुन्हेगारीच्या जाळ्यात सापडत आहेत. अल्पवयीन बालके वाहन चालवितात, व्यसनाकडे वळलेले दिसून येत आहेत. त्यामुळे बालकांनी सोशल मीडियाचा योग्य त्या प्रमाणात वापर करावा आणि पुस्तकी ज्ञानाकडे जास्त लक्ष द्यावे, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी केले. त्याच बरोबर चाईल्ड लाईन ने समाजात सोशल मीडिया विषयी जनजागृती करावी व कोणतीही समस्या असल्यास पोलिस विभाग व चाईल्ड लाईन सोबत बालकांनी संपर्क साधावा असे आव्हान केले. या कार्यक्रमाप्रसंगी भंडारा शहरातील दहा शाळेच्या विद्यार्थींनी सहभाग नोंदवीला. तसेच विद्यार्थ्यांच्या सोबत शिक्षेत्तर कर्मचारी सुद्धा उपस्थित होते. बालक मेळावा प्रसंगी विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या कला सादर केल्या तर शाळेतील विद्यार्थींनी समूह नाटक, कलापथक, गीतगायन सादर केले.

यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व आकर्षक बक्षिसे देण्यात आली. बालकमेळाव्याच्या कार्यक्रमाची प्रस्तावना समुपदेशक वैशाली सतदेवे तर संचालन त्रिवेणी गडपायले, समन्वयक लोकप्रिया देशभ्रतार यांनी केले तर आभार प्रदर्शन टीम सदस्य सुरेखा गायधने यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पानझाडे, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विजू गवारे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी पौनीकर, अध्यक्ष बालकल्याण समिती अ‍ॅड. सानिका वडनेरकर, एकात्मिक बालविकास अधिकारी श्री.निपसे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नितीन साठवणे, पूर्व विदर्भ कार्यक्रम समन्वयक युवा रुरल असोसिएशन नागपूर जितेंद्र देशमुख, सदस्य बालकल्याण समिती सातव, सदस्य बालकल्याण समिती सौ.मेघा खोब्रागडे तसेच कामगार विभागातील कर्मचारी व सखी वन स्टॉप सेंटर येथील वैशाली वाघाडे आदी कर्मचारी प्रामुख्याने बाल मेळाव्यात उपस्थित होते. तसेच चाइल्ड लाईन समन्वयक लोकप्रिया देशभ्रतार, समुपदेशक वैशाली सतदेवे, टीम सदस्य सुरेखा गायधने, पूजा धकाते, त्रिवेणी गडपायले, विजय रामटेके, राकेश लांजेवार, सुनील राणे, अक्षय खोब्रागडे यांनी कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *