केंद्रीय राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते पोहोचले डॉ.फुके यांच्या लाखनी निवासस्थानी

भंडारा : केंद्रीय ग्रामविकास व पोलाद राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते यांनी गोंदिया व भंडारा जिल्ह्याच्या दौºयावर असताना महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री डॉ.परिणय फुके यांच्या लाखनी येथील निवासस्थानी भेट दिली. गोंदिया जिल्ह्यातील सड़कअजुर्नी येथे भाजप पदाधिकाºयांची बैठक संपल्यानंतर केंद्रीय मंत्री श्री कुलस्ते डॉ.परिणय फुके यांच्या लाखनी निवासस्थानी पोहोचले. डॉ.परिणय फुके यांनी केंद्रीय राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते यांचे स्वागत, अभिवादन व सत्कार करून त्यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा केली. या बैठकीत श्री.कुलस्ते यांनी भाजपच्या अनेक पदाधिकाº्यांची भेट घेऊन भाजपने सुरू केलेल्या ह्यहर घर कमलह्य अभियानाची माहिती घेतली व डॉ.परिणय फुके यांच्या निवासस्थानी कमळ फुलवून ही मोहीम अधिक व्यापक करण्याचे आवाहन केले. केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती देताना केंद्रीय राज्यमंत्री म्हणाले की, भाजपने आपल्या कार्यकाळात भ्रष्टाचारमुक्त शासन दिले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचून सभासदत्व अभियानाचा प्रचार करून प्रत्येक घरात कमळ फुलवायचे आहे. या दरम्यान विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, खासदार सुनील मेंढे, आमदार तथा क्लस्टर प्रमुख प्रवीण दटके, हेमंतभाऊ पटले उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *