पवनी येथे कबड्डी स्पर्धेचे महासंग्राम सुरु

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पवनी : लक्ष्मी रमा सभागृह पवनी येथे युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवनी शहर व शिवछत्रपती कबड्डी क्रीडा मंडळ पवनी द्वारा आयोजित दिवस व रात्रकालीन खुले सामने पुरुषांचे भव्य कबड्डी महसंग्राम दि. २२ फेब्रुवारी पासून सुरु झाले असून २४ फेब्रुवारी २०२४ पर्यंत आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे उद्दघाटक म्हणून विजय सावरबांधे (तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पवनी), अध्यक्ष तोमेश्वरभाऊ पंचभाई (माजी सदस्य पवनी तथा महासचिव राष्ट्रवादी काँग्रेस पवनी), सहउदघाटक सौ.नूतन कुर्झेकर (सभापती पं.स.पवनी), प्रमुख अतिथी म्हणून सौ.जयशिला भुरे (अध्यक्ष महिला आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पवनी), श्रीमती शोभना गौरशेट्टीवर (माजी सभापती न. प. पवनी), डॉ. विजय ठक्कर (माजी नगराध्यक्ष न. प. पवनी), जितु नखाते (तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पवनी), हेमंत मेनवाडे (युवक तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पवनी), लिनेश उर्फ टिंकु पाटील सेलोकर, चरणभाऊ पलवार (तालुका प्रसिद्धी प्रमुख), गोपाल करिहार (शहर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पवनी), परवेज खान, अरविंद काकडे (फोटो ग्राफर), गोलू अलोणे (तालुका उपाध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस पवनी), लंकेशभाऊ मुंडले (शहर प्रसिद्धी प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पवनी), बंटी आंबेकर, युवराज करकाडे, सुधाकर मानापुरे, अनिकेत सावरकर आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला प्रमुख नेत्यांनी मार्गदर्शन करतांना खेळ हा प्रत्येकाच्या जीवनाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे जो खेळणाºया सर्व लोकांना टीम वर्क, समन्वय यासारखे विविध गुण शिकण्यास मदत करतो आणि शरीराला मजबूत आणि निरोगी ठेवण्यास मदत करतो.

अभ्यास किंवा पुस्तके खेळांपेक्षा जास्त महत्त्वाची आहेत, असा अनेकांचे मत असेल. पण सत्य हे आहे की अभ्यास आणि खेळ या दोघांना जीवनात तितकेच महत्वाचे आहेत, किंबहुना दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सतत काम केल्याने तुम्ही थकत नाही तर तुमची काम करण्याची क्षमता कमी होते. म्हणून, चांगली काम करण्याची क्षमता आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी कधीहि तंदुरुस्त असावे. हा तुम्हाला आवडणारा कोणताही खेळ असू शकतो. म्हणून, व्यस्त दिवसातून थोडा वेळ काढणे आणि तंदुरुस्त आणि सक्रिय राहण्यासाठी एखाद्या खेळात गुंतून वेळ घालवणे महत्वाचे आहे. दीर्घ आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी, एक व्यक्ती मानसिक, शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे महत्वाचे आहे. केवळ यामुळेच, वर्षानुवर्षे लोकांची खेळांमध्ये रुची वाढली आहे, असे सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पवनी शहर युवक अध्यक्ष सोनू रंगारी, संविधान नवनांगे, नूतनभाऊ घोडीचोरे व शिव छत्रपती क्रीडा मंडळ पवनी च्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *