विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचारी देणार पंचायत समितीवर धडक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिहोरा : पंचायत समिती तुमसर अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायत कर्मचाºयांची सभा आज दि.९ जुलै रोजी भंडारा जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटना आयटकचे जिल्हा सहसचिव कॉ. रामलाल बिसेन यांचे अध्यक्षते खाली तर शिवराम भूतांगे व मुरलीधर उरकुडे यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडली.या सभेला तुमसर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .या सभेत ग्रामपंचायत कर्मचाºयांच्या विविध मागण्या संबंधात सविस्तर चर्चा करण्यात आली . ग्रामपंचायत कर्मचाºयांना वेळेवर वेतन न देणे ,वषार्नुवर्ष रखडलेले थकीत वेतन देने, राहणीमान भत्ता ,वेतनातून कपात झालेली भविष्य निर्वाह निधी कर्मचाºयांच्या खात्यात जमा न करणे ,मृत कर्मचाºयाांच्या वारसानांस अनुकंपा तत्वावर नोकरीवर घेणे ,रोजंदारी कर्मचाºयास कायम करणे ,शासनाने ठरवून दिलेल्या वेतनापेक्षा कमी वेतन देणे असे अनेक मागण्या प्रलंबित असल्यामुळे त्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी तुमसर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाºयांनी १९ जुलै रोजी पंचायत समिती तुमसर येथे मोर्चाद्वारे धडक देऊन धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे .

या मोर्चा व धरणे आंदोलनाचे नेतृत्व भंडारा जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटना आयटकचे जिल्हा कार्याध्यक्ष कॉ. शिवकुमार गणवीर ,जिल्हाध्यक्ष कॉ. माधवराव बांते, जिल्हा सचिव कॉ. हिवराज उके व जिल्हा सहसचिव कॉ. रामलाल बिसेन हे करणार आहेत .या मोर्चा व धरणे आंदोलनात तुमसर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाºयांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तुमसर तालुका संघटनेचे सचिव खेमराज शरणांगत, कृष्णकुमार डहाळे ,जया राऊत ,बालु शेंद्रे, दिलीप बोपचे, उमाशंकर मुरे,देवीलाल पारधी , गणेश आंबेडारे, विलास घोडीचोर , जयलाल पटले, रतन झंजाड,संतोष शेंडे,जनार्धन उपरीकार,कुंडलिक टेंभरे, रिता बोरकर ,दुर्गा वनवे व प्रमिला पारधी यांनी केले आहे .

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *