ट्रकच्या धडकेत महिला घटनास्थळी ठार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : राष्ट्रीय महामार्ग मुंडीपार शिवारात अज्ञात ट्रकच्या धडकेत एक महिला घटनास्थळी ठार झाल्याची घटना शुक्रवार (ता.२१) ला दुपारी २ वाजता दरम्यान घडली. भद्रशिला जितेंद्र बन्सोड (४०) रा. सावरी (जवाहरनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. मुतक भद्रशिला जितेंद्र बन्सोड ही पती जितेंद्र धर्मराज बन्सोड (४९) सोबत सावरी जवाहरनगर वरून गोंदिया येथे नातेवाईकांचे घरी वास्तुपुजनाला जात होते. मुंडीपार शिवारात अज्ञात ट्रकच्या धडकेत भद्रशिला जितेंद्र बन्सोड ही महिला घटनास्थळी ठार झाली. मृतदेह उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे शवविच्छेदन करीता पाठविण्यात आले. साकोली पोलीस ठाणे येथे घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास साकोली पोलीस करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *