नगर परिषद प्रशासकपदी मुख्यधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांची नियुक्ती

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : सध्यास्थितीत राज्यातील राजकीय परिस्थितीमुळे नगरपालिका निवडणूका लांबणीवर पडल्या आहेत. दरम्यान भारतीय संविधानातील अनुच्छेद २४३ तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ४०,४१ मधील तरतुदीनुसार पालिकेची मुदत ही पहिल्या बैठकीपासुन जास्तीत जास्त पाच वर्षांची असल्यामुळे सदर मुदत पुढे ठेवता येणार नसल्यामुळे माहे नोव्हेंबर, २०२१ व जानेवारी, २०२२ तसेच फेब्रुवारी, २०२२ मध्ये मुदत संपत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासकपदी उपविभागीय अधिकारी बी. वैष्णवी यांची तुमसर नगरपरिषद येथे प्रशासक पदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र प्रशासकीय कारणास्तव तुमसर नगरपरिषद येथे प्रशासक पदी मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी नुकतेच आदेश काढले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *