आधुनिक बायोगॅस संयंत्र जोडणीमुळे महिलांचे जीवन झाले सुखकर

भंडारा प्रतिनिधी/तालुका प्रतिनिधी मोहाडी : भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि शेती हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेत पशुधन महत्त्वाची भूमिका बजावते व त्यातच जनावरांचे शेण मोठ्या प्रमाणात मिळते. हे लक्षात घेऊन मोहाडी तहसील येथे दोन हजाराहून अधिक कुटुंबांना बायोगॅस कनेक्शनचे वाटप करण्याचे उद्दिष्ट युवा रुरल अशोशिऐशने ठेवले आहे. मोहाडी तालुक्यातील दोन हजार शेतकरी कुटुंबांच्या घरात गोबर गॅस प्लांट बसवण्यात आला आहे. या गोबरगॅस प्लांटमधून तालुक्यात दोन हजार कुटुंबांची स्टोव पेटले आहे. गोबरगॅस प्लांट बसवणे खूप सोपे आहे. इन्फोसिस कंपनीच्या उरफ फंड आणि सिस्टीमा कंपनीची तंत्रज्ञान यांच्या माध्यमातुन युवा रूरल असोसिएशन लाभधारकांना बायोगॅस प्रकल्प पूर्णपणे मोफत देत आहे. खते व इंधनाच्या तुटवड्यामुळे शेतकºयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेण आणि लाकूड याशिवाय इतर कोणतेही साहित्य शेतकºयांसाठी फारसे उपलब्ध नाही. गोबरगॅस प्लांट शेतकरी कुटुंबांसाठी फायदेशीर ठरत आहे.

गोबरगॅस प्लांटमधून तयार होणाºया गॅसने या कुटुंबांची स्टोव्ह जळत असून या कुटुंबातील महिला केवळ एक वेळच नव्हे तर दुपारचे आणि रात्रीचे जेवणही बनवत आहेत. याशिवाय टाकाऊ शेणही शेतात खत म्हणून वापरले जात आहे. घरातील तीन ते चार जनावरांच्या सुमारे २५ किलो शेणातून एका दिवसात सुमारे पाच ते सहा किलो गॅस तयार होतो. या वायूपासून दिवसभराचे अन्न तयार केले जाते. प्लांटमधून निघणारा वायू थेट किचनमध्ये पाईपद्वारे पुरवला जातो. आता छढॠ गॅस सिलेंडरची किंमत १२०० रुपयांवर पोहोचली आहे, त्यामुळे ही योजना लोकांसाठी वरदान ठरत आहे. बायोगॅस लावल्यापासून महिलांना लाकडासाठी भटकंती करावी लागत नाही. स्त्रियांची चुलीपासून सुटका झाली आहे. तसेच स्टोव्हच्या धुरापासून सुटका करून कमी वेळात अन्न तयार होत आहे. शेण हा महिलांना घरातच उपलब्ध होते तर सिलेंडर हा बाजारातून विकत घ्यावा लागत होता. मोहाडी तालुक्यांमध्ये सद्यस्थितीत दोनहजार शेतकरी कुटुंबांनी या योजनेचा लाभ घेतला असून शेणखताची उभारणी करणे अत्यंत सुलभपणे व कोणताही खर्च न करता उपलब्ध होणार असल्याचे मोहाडीचे तालुका समन्वयक शैलेश साऊसाखरे यांनी सांगितले. मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव येथे गुरुवार दि. २२ आॅगस्ट २०२२ ला बायोगॅस मार्गदर्शन शिबीर घेण्यात आला. त्यामधे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा उद्योंग केन्द्र भंडारा व गोदिया (उद्योग निरीक्षक) बी.खरमाटे, गटविकास अधिकारी मोहाडी पल्लवी वाडेकर, तालुका अभियान व्यवस्थापक सुनिल पटले, महिला समुपदेशन केन्द्र भंडारा मृणाल मुनेश्वर, विस्तार अधिकारी बोदले व रामकृष्ण तेलमासरे, कृषी अधिकारी भोयर, युवा रुलर असोसिएशन नागपुरचे कार्यक्रम समन्वयक देवराज पाटील उपस्थित होते.

शेतकरी वनिता खोब्रागडे, मधु भुते, तुलसी मोहतुरे यांनी आपले अनुभव सांगताना ते म्हणाले की, घरात ६ जणांचे कुटुंब असून बायोगॅसचा वापर करून घरातील महिला स्वयंपाकघरात अन्न शिजवतात. गोबरगॅस प्लांटमध्ये आतापर्यंत कोणतीही समस्या आलेली नाही. यासाठी रोज २५ किलो शेण टाकून गॅस बनवला जातो, जो दोन्ही वेळेस चालू राहतो. त्यासाठी गॅस सिलिंडर घेण्याची गरज नाही. बायोगॅससह पूर्णपणे गॅससारखे कार्य करते. हे प्रकल्प राबविण्यामागे युवा रुरल अशोशिऐशन, नागपूरचे संस्थापक दत्ता पाटील, प्रकल्प अधिकारी देवराज पाटील, तालुका समन्वयक शैलेश साउसाखरे तसेच मोहाडी तालुक्यातील सर्व फिल्ड आॅपरेटर व फिल्ड आॅफिसर विशाल पारधी, आकाश निमकर, प्रितम कुंभारे, शिवपाल शेन्डे, प्रिती बडवाईक, चंदू बडवाईक, समीर कुकडे, शैलेश कुकडे, आकाश कुकडे, रणवीर बाहे, नितेश सेलोकर, रविद्र श्रीरामे, रुपेश साऊसाखरेचे महत्त्वाचे योगदान आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *