प्रगती महिला महाविद्यालयात निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : स्थानिक प्रगती महिला कला महाविद्यालयात बी.ए. अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनींचा निरोप समारंभ कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. प्राचार्य डॉ. श्यामकुमार चरडे यांच्या मार्गदर्शनात व अध्यक्षतेत बी.ए. द्वितीय वर्ष आणि प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी बी.ए.अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनी कु. स्वामिनी जमजार, भावना मांदळे, कल्याणी निंर्बाते, करिश्मा लोले, टिनू साकोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाने आम्हाला घडविले, आमच्या अडचणी समजून घेऊन प्राध्यापकांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केले. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्हाला अभ्यासक्रम पूर्ण शिकविला गेला. त्यासोबतच स्पर्धा परीक्षेच्या विविध प्रकारांची माहिती देऊन, अभ्यास कसा करावा याबद्दल मार्गदर्शन केले.

याप्रसंगी डॉ. गजानन कळंबे, डॉ. जयश्री सातोकर, डॉ. क्रिष्णा पासवान, डॉ. शालिक राठोड, डॉ. ज्ञानेश्वर हिवसे, प्रा. पुष्पा ठाकरे, डॉ. जोत्स्ना गजभिये, डॉ. पलाश करकडे, प्रा. दुर्गाप्रसाद चौधरी, संजय वानखेडे या सर्वांनी विद्यार्थिनींच्या भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ. चरडे यांनी विद्यार्थिनींच्या उज्वल भविष्याची कामना करून, शुभाशीर्वाद दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संचलन कु. आरती कश्यप हिने तर कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचे आभार कु. दामिनी कडव या विद्यार्थिनीने मानले. अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनींना भेटवस्तू देऊन याप्रसंगी त्यांचा सत्कार करण्यात आला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *