५५ वी राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेत भंडारा जिल्ह्याातील संघ सहभागी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : ५५ वी राज्यस्तरीय खो खो स्पर्धा ही विदर्भ खो खो असोशियेशन यांच्या निर्देशानुसार दि. ११ नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर २०२२ ला ५५ वी राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धा पुरुष व महिला गटाची यवतमाळ जिल्ह्यातील मित्र क्रीडा मंडळाच्या मैदानावर पांढरकवडा येथे मित्र क्रीडा मंडळ व खेतानी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. यामध्ये विदर्भातील ११ जिल्ह्यातील संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेतून राष्ट्रीय खो खो स्पर्धेकरिता विदर्भ खो खो संघाची निवड करण्यात येते. या स्पर्धेमध्ये विदर्भ खो खो असोसिएशन चे सचिव सुधीर निंबाळकर व विदर्भ खो खो असोसिएशन चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. भंडारा जिल्हा खो खो असोशियेशन तर्फे ७ नोव्हेंबर ला भंडारा जिल्ह्याचा पुरुष गटाचा संघाची निवड करण्यात आली. निवड प्रकियेमध्ये भंडारा जिल्हा खो खो असोशियेशन चे सचिव पुरूषोत्तम सेलोकर व भंडारा जिल्हा खो खो असिशियेशनच्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आली. यामध्ये भंडारा जिल्ह्याचा खो खो संघामध्ये पवनीतील डोन्ट वरी ग्रुपचे खेडाळू धृप बोटकुले, मिलिंद तूळानकर, मंगेश बावनकर, ऋषिकेश भांडक्कर, राहुल निंबेकर, अक्षद आसई व भंडारा तालुक्यातील प्रणय ईश्वरकर, आदित्य ठवकर, स्वप्नील कुंभारे, दिनेश मारबते, अतुल ईश्वरकर, प्रेम मारबते, प्रज्वल चोपकर, सारंग घुघुस्कर, गुड्डू केवट व संघ व्यवस्थापक म्हणून डोन्ट वरी ग्रुप व सिटिझन फोरम चे संघर्ष अवसरे आणि संघ प्रशिक्षक म्हणून डोन्ट वरी ग्रुप व सिटिझन फोरम चे योगेश बावनकर होते.

ही स्पर्धा तीन दिवसीय होती व यामध्ये पवनीच्या डोन्ट वरी ग्रुप ची चौफेर प्रशांसा होत असून खेडळूंना जिल्हास्तरीय ते राज्यस्तरीय पर्यंत खेळविले त्याकरिता डोन्ट वरी ग्रुप व सिटिझन फोरमचे योगेश बावनकर, संघर्ष अवसरे, निखिल शहारे, धृप बोटकुले, निखिल ढमदे, आशुतोष रायपूरकर, श्रेयश कुर्झेकर, उल्हास सावरकर, वेदांत भोयर यांनी परिश्रम घेतले. पवनी येथे डोन्ट वरी ग्रुप तर्फे खो खो चे मोफत प्रशिक्षण सक्सेना शाळेचा मैदानावर देत असून डोन्ट वरी ग्रुप चा मुलांना जिल्हास्तरीय राज्यस्तरीय व तसेच राष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी देत असून डोन्ट वरी ग्रुप व सिटिझन फोरमच्या पदाधिकºयांनी विदर्भ खो खो असोसिएशन चे सचिव सुधीर निंबाळकर आणि सर्व पदाधिकारी व तसेच जिल्हा खो खो असोसिएशन चे सचिव पुरूषोत्तम सेलोकर व सर्व पदाधिकारी यांचे आभार व्यक्त केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *